दोंडाईचा: केंद्र सरकारच्या सी सी आय चे कापूस खरेदीचा यावर्षीचे महाराष्ट्रातील पहीले केंद्र शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून झाले असून त्याचा शुभारंभ माजी मंत्री आ. जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते करण्यात आला. सुरुवातीला केशरानंद जिनिंग नंतर शिंदखेडा येथील वर्धमान जिनिंग या दोन्ही ठिकाणी खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बाजार समिती सभापती तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जि प उपाध्यक्ष कामराज निकम, गटनेते अनिल वानखेडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र देसले, पंस सभापती अरुण पाटील, उपसभापती नारायण गिरासे, उपनगराध्यक्ष रवी उपाध्ये, जि प सदस्य ज्ञानेश्वर भामरे, पंकज कदम, माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, अप्पर तहसीलदार सुदाम महाजन, माजी सभापती जिजाबराव सोनवणे, जिल्हा संघटन सरचिटणीस डी एस गिरासे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, अशोक देसले, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा. रमेश खैरनार, पंस सदस्य साहेबराव गोसावी, दगाजी देवरे, भरत पवार, दीपक मोरे, रणजित गिरासे, कृऊबा संचालक मोतीलाल पाटील, सर्जेराव पाटील, सखाराम पाटील,साहेबराव पेंढारकर, सुनील पवार, जगतसिंग गिरासे, अनिल गायकवाड, भाजप शहराध्यक्ष दिनेश सुर्यवंशी, नगरसेवक चेतन परमार, बाळासाहेब गिरासे, दिपक चौधरी आदी उपस्थित होते.
Tags
news