मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करा - जिल्हाधिकारी संजय यादव




धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तूर्तास प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाच्या आहेत. त्यात वेळोवेळी साबण किंवा सॅनेटायझरने हात धुणे, मास्कचा नियमितपणे वापर करणे आवश्यक आहे. असे असताना अनेकजण मास्क वापरताना दिसून येत नाहीत. ही चिंतेची बाब आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने मास्क न वापरणाऱ्यांविरुध्द कडक कारवाईसाठी मोहीम सुरू करावी. अन्यथा माझ्यासह महानगरपालिका आयुक्त, पोलिस अधीक्षक रस्त्यावर उतरून मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करतील, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले. आयुक्त श्री. शेख म्हणाले, की विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात येत आहे. ज्या भागात सर्वाधिक विना मास्क नागरिक आढळून येतील त्या भागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने