उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून ”गाय की रोटी” सुत्य उपक्रमाचा शुभारंभ




शिरपूर : उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून ”गाय की रोटी” सुत्य उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून शहरातील नागरिक या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देत आहेत. यामुळे गो मातेची सेवा देखील होणार आहे.


शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून ”गाय की रोटी” हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला असून विविध भागातील गो शाळेतील गायींना या शहरातून एकत्रितपणे गोळा करण्यात आलेल्या सर्व रोटी (पोळ्या) खायला देऊन सर्व नागरिकांच्या हातून गो सेवा घडविण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यातआले आहे.


शिरपूर वरवाडे नगर परिषदे मार्फत प्रत्येक घरुन अनेक वर्षांपासून घंटा गाडी जाऊन ओला व सुका कचरा संकलित केला जातो. यासाठी वाहनांची व्यवस्था नगर परिषदे मार्फत करण्यात आलेली आहे. याच वाहनांद्वारे आता गो मातेसाठी रोटी सुद्धा संकलित केली जाणार असून संकलित केलेल्या गो मातेच्या रोटी या गो शाळेतील गायींना देण्यात येणार आहेत. नगरपरिषदे मार्फत घंटा गाडीवर गो मातेच्या रोटी संकलन करण्याची सोय करण्यात आली आहे.


'स्वच्छ शिरपूर, हरित शिरपूर' अशी ओळख

असलेल्या शिरपूर वरवाडे नगर परिषदेने अनेक उपक्रमांमध्ये महाराष्ट्रात व देशभरात विविध पारितोषिके प्राप्त केलेले आहेत. अशा या नेहमीच उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या माध्यमातून कचरा संकलन सह गोमाते साठी रोटी संकलन करण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. या बद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.


या अभिनव उपक्रमाबद्दल माजी मंत्री अमरिशभाई पटेल, शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, सर्व विभागांचे सभापती, सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी अमोल बागुल, प्रशासकीय अधिकारी संजय हासवानी, स्वच्छता निरीक्षक श्री अहिरे, अधिकारी व कर्मचारी यांना शहरातील नागरिक धन्यवाद देत आहेत.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने