धुळे तालुक्यातील सडगाव येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल शाखेचे फलक अनावरण करण्यात आले.यावेळी गावातील हनुमान मंदिरात आरती व प्रभू श्रीरामांचे प्रतिमपूजन करून तसेच कार्यक्रमानंतर वृक्षारोपन करण्यात आले.हिंदू राष्ट्र एकात्मतेची धारना मनात घेऊन कार्य करणाऱ्या युवकांनी गावात या शाखेचे उद्घाटन केले.यावेळी संत गण कैलास गायकवाड(जळगाव विभाग मंत्री)संजय चौधरी(जिल्हा संघचालक)योगीराज मराठे(धुळे जिल्हाध्यक्ष)गोवर्धन पटेल (जिल्हा उपाध्यक्ष)ऍड.विशाल पिंगळे(जिल्हा मंत्री)अनिल मोरे(जिल्हा संयोजक)निलेश रूनवाल(महानगर उपाध्यक्ष) व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी सर्व पदाधिकारी मातृशक्ती.दुर्गा वाहिनी संयोजिका यांना धर्म कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
Tags
news