नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून .
नाशिक-:पीकविमा कंपनी शेतकऱ्यांची करत असलेली लूट तसेच त्यामध्ये असलेल्या त्रुटी सह योजनेसंदर्भातील विविध मागण्यासाठी मराठवाडा परिसरातील शेतकरी पुत्रांनी आम आदमी पक्षाच्या युवा आघाडीचे प्रदेश संयोजक अजिंक्य शिंदे यांच्यासोबत मंगळवारी मंत्रालयात कृषीमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेत परिसरातील गावातून शेतकऱ्याकडून गोळा केलेली जवळपास तीन हजार निवेदने त्यांना देण्यात आली.
गेले काही दिवस आप चे अजिंक्य शिंदे व त्यांचे सहकारी ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. मागील एक महिन्यापासून पिक विमा कंपनीच्या जाचक अटीं व वीमा योजनेतील त्रुटी बाबत गावोगावी जनजागृती करत आहेत. त्या माध्यमातून त्यांनी जवळपास तीन हजार शेतकऱ्यांशी संवाद साधत विमा कंपनी कडे शेतकरी भरत असलेल्या हप्त्या सोबत शासनाकडुन भरण्यात येणाऱ्या हप्त्याच्या प्रमाणात मिळणारा परतावा कमी असल्याची माहिती दिली. दरम्यान शेतकऱ्यांचे म्हणणे मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी प्रत्येकाकडून निवेदने गोळा केली आहेत.
योजेनेतील नियम हे फक्त शेतकऱ्यांसाठी नसून ते कंपनीसाठी देखील लागू असल्याचे सांगत शेतकरी पुत्रांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना ७२ तासात नुकसानीची माहिती देणे बंधनकारक आहे तर नुकसानीची माहिती दिल्यानंतर ४८ तासात कंपनीकडून सदर नुकसानीची पाहणी करून १० दिवसात अहवाल तयार करून दोन महिन्यात शेतकऱ्यांना विमा मिळणे बंधनकारक आहे. परंतु असे होताना दिसत नाही.
त्यासोबतच कंपनीचे तालुका निहाय कार्यालय नाही, टोल फ्री क्रमांकावर संपर्क होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारण होत नाही. तसेच नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्याना परतावा देखील दिला जात नाही.
शेतकरी पुत्रांनी मागील आठवड्यात या संदर्भात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची भेट घेतली होती. दरम्यान मंगळवारी त्यांनी मंत्रालयात राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन त्यांना योजनेतील त्रुटी बाबत माहिती देत शेतकऱ्यांची निवेदने दिले.
पीकविमा योजनेत असंख्य त्रुटी असून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याची शेतकरी पुत्रांनी श्री भुसे यांना नजरेस आणून दिले. त्यात तथ्य असून पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा करून त्रुटी दूर करू असे मंत्र्यांनी सांगितले.
Tags
news
2019-20 निलंगा तालुक्यातील सर्व आंबा फळ उत्पादक शेतकरी विमा भरले होते परंतु गारपीट वादळी वारा व पाऊसा मुळे 90%नुकसान झाले होते भारतीय कृषी विमा कंपनी चे प्रतिनिधी येऊन पंचनामा केले होते परंतु आम्हाला आध्याप विमा मिळाले नाही कारण कालवावे ही विनंती
उत्तर द्याहटवा