शिरपूर : कॅडिला हेल्थ लिमिटेड अहमदाबादचे जनरल मॅनेजर सिद्धार्थ दास आणि मॅनेजर (एच.आर.) दयानंद सिंग यांनी आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. संस्थेचे उपाध्यक्ष राजगो
कॅडिला हेल्थकेअर लिमिटेड ही एक बहुराष्ट्रीय संशोधन आधारित फार्मास्युटिकल कंपनी आहे. कॅडिला फार्मास्युटिकल्स मॅन्युफॅक्चरिंग सुविधेला डब्ल्यूएचओ-जीएमपी, यूके-एमएचआरए, यूएसएफडीए-एपीआय, टीजीए-ऑस्ट्रेलिया आणि आयफा-इटली यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी मान्यता दिली आहे. कॅडिला फार्मास्युटिकल्सचे आंतरराष्ट्रीय कार्य अमेरिका, जपान, आशिया, सीआयएस आणि आफ्रिका या देशांसह ५८ देशांमध्ये विस्तीर्ण आहे. या ग्रुपमध्ये जगभरात १९,५०० हून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.
आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालय हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव अंतर्गत नामांकित महाविद्यालय असून नेहमीच विदयार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील असते. कॅडीलासारख्या बहुराष्ट्रीय कंपनी सोबत संबंध प्रस्थापित करून विद्यार्थ्यांना नोकरीची संधी प्राप्त व्हावी या हेतूने हि भेट आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालयाचे काही माजी विद्यार्थी या कॅडीला फार्मासुटिकल्स मध्ये तसेच विविध बहुराष्ट्रीय फार्मा कंपनी मध्ये कार्यरत आहेत.
मागील सप्ताहात कॅडिला हेल्थकेअर लिमिटेड अहमदाबादचे मॅनेजिंग डायरेक्टर शर्वीलभाई पटेल यांनी महाविद्यालयास भेट दिली होती. महाविद्यालयातील आधुनिक शिक्षण पद्धतीने सुसज्ज असे स्मार्ट क्लास रूम्स, स्मार्ट बोर्डस, नवनवीन इन्फॉर्मशन अँड कम्युनिकेशन टेक्निक्स, वेब-बेस्ड लर्निंग, संशोधन क्षेत्रात उच्च प्रतीचे योगदान सातत्य, आंतरराष्ट्रीय मानदंडानुसार असलेल्या प्रयोग शाळा, ६०० हुन अधिक प्राणी असलेले ऍनिमल हाऊस, २ कोटीहून अधिक पुस्तकांचे ग्रंथालय, महाविद्यालयाला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया यांची मान्यता नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडीटेशन कौंसिल नँक कमिटी चे मानांकन, नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडीटेशन (एनबीए) या संस्थेचे थर्ड सायकल (तिसऱ्यांदा) मानांकन, नॅशनल इन्सिस्टयुट ऑफ रॅकींग फ्रेमवर्क (NIRF) नुसार देशात टॉप ५० वे स्थान, या सर्व गोष्टीमुळे प्रभावित झाले.
सिद्धार्थ दास (जनरल मॅनेजर) व दयानंद सिंग मॅनेजर (एच.आर.) यांनी महाविद्यालयाला कॅडीला फार्मास्युटिकल सोबत सक्रियपणे कनेक्ट करून कंपनी विदयार्थ्यांना प्रशिक्षण देऊन विदयार्थ्यांची भरती करण्यात सहभागी होणार असल्याचे सांगितले. विद्यार्थी फार्मसीचे शिक्षण घेत आहेत परंतु वाढत्या प्रगतीनुसार इंडस्ट्री मध्ये नवनवीन उपकरणे, नवीन टेकनॉलॉजी, सॉफ्टवेअर यांचा उपयोग होत असतो. तेव्हा त्याबद्दल विदयार्थ्यांना प्रशिक्षण देऊन इंडस्ट्री मध्ये नोकरीच्या संधी मिळाव्या यादृष्टीने प्रयत्न करू तसेच प्राध्यापक यांना देखील आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून देऊन चांगले विद्यार्थी घडतील या दृष्टीने कॅडीला हेल्थकेअर प्रयत्नशील असेल. ग्रामीण भागातील विदयार्थी महाविद्यालयात शिकत आहेत. हुशार, होतकरू, स्वतःची प्रगती करू इच्छिणारे सर्व विदयार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देता यावी यासाठी नक्कीच प्रयत्न करू. कॅडीला संशोधन विभाग उत्पादन (मॅनुफॅक्चरिंग) आणि क्वॉलिटी कंट्रोल विभागात कश्याप्रकारे नोकरीच्या संधी आहेत याबद्दल माहिती दिली आणि लवकरच कॅम्पस मुलाखतीद्वारे या संधी महाविद्यलयातील विदयार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सामंजस्य करार करण्याचे आश्वासन प्राचार्य डॉ. एस. जे. सुराणा व उपप्राचार्य प्रा. डॉ. अतुल शिरखेडकर यांना दिले.
प्रसंगी विभागप्रमुख प्रा. डॉ. एच. एस. महाजन, प्रा. डॉ. एस. एस. चालिकवार, प्रा. श्रीमती डॉ. एस. डी. पाटील, प्रा डॉ. एम जी कळसकर डिप्लोमा प्राचार्य डॉ. नितीन हसवानी, रजिस्ट्रार जितेश जाधव उपस्थित होते.
