शहादा तालुका प्रतिनिधी प्रतिनिधी (अश्विन सोनवणे)
शहादा तालुक्यातील बामखेडा त.त. हे गाव अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य महामार्ग 4 वरील सर्वात मोठे गाव आहे. या गावात शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना आहे. या राज्य महामार्ग क्रमांक चार वरील गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या १ वर्षांपासून बंद दिसून येत आहे. हे गाव महामार्ग क्रमांक चार वर असून देखील दवाखाना सुरू राहत नाही.या गावात मोठ्या प्रमाणात पशुधनाची संख्या आहे.यात बैल,गायी,म्हैशी,शेळी,आदी. पशुची संख्या खूप मोठी आहे.या गावातील पशू वैद्यकीय दवाखान्यातील कर्मचारी वर्ग येत नसल्यामुळे पशुमालकाला खाजगी वैद्याचा सहारा घ्यावा लागत असून त्यासाठी आर्थिक भुर्दंड देखील नाहक सोसावा लागत आहे.या गावातील पशू वैद्यकीय दवाखाना असूनदेखील पशुधन मालकाला निरुपयोगी ठरत आहे.हा दवाखाना केवळ शोभेची वास्तू बनली आहे.या पशुवैद्यकीय दवाखान्यात कर्मचारी वर्ग येत नसून त्यामुळे गावातील पशू मालकांना पशू रोगाची आणि आजाराची लक्षणे दिसू लागल्यावर वैद्य वेळेवर मिळून न आल्यास उपचाराअभावी पशू मालकाचे पशुला जीव गमवावा लागून मोठी नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.या गावातील पशू वैद्यकीय कर्मचारी वर्ग येत नसून मग पशुधन मालकांचा वाली कोण ?हा देखील संशोधनाचा विषय निर्माण होत आहे.
या गावातील पशू वैद्यकीय दवाखान्यात संबंधित वैद्यकीय कर्मचारी वर्ग का येत नाही.या पशू वैद्यकीय दवाखान्यातील कर्मचारी वर्ग फिरकत का नाही.या गावातील पशू वैद्यकीय दवाखान्यातील कर्मचारी वर्गाला पशू वैद्यकीय दवाखान्यातील कर्मचाऱ्यावर कोणाची मेहरबानी आहे ? असा संतप्त प्रश्न पशुधन मालक विचारू लागलेला आहे.ही मेहरबानी आहे तर मग ती मेहरबानी का अन् कशासाठी हा देखील सद्या संपूर्ण गावात चर्चेचा मुद्दा सर्वत्र उपस्थित केला जात आहे.या गावातील पशू वैद्यकीय दवाखान्यात घाणीचे साम्राज्य देखील निर्माण झालेले पाहावयास मिळत आहे.या गावातील पशू वैद्यकीय दवाखान्यात कर्मचारी नेमणूक केलेली आहे की नाही हे वास्तव देखील गुलदस्त्यात कायम आहे.या अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर राज्य महामार्ग क्रमांक चार वरील पशू वैद्यकीय दवाखान्यात कोणी कर्मचारी वर्ग उपस्थित राहत नसतील तर ग्रामीण भागातील पशू वैद्यकीय दवाखान्याची काय परिस्थीती असेल.याची वास्तवतेची कल्पना न केलेली बरी.या गावातील पशू वैद्यकीय दवाखान्यात तालुक्याचे पशू वैद्यकीय प्रशासनाने तसेच जिल्हा पशू वैद्यकीय प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे बनले ले आहे. या गावातील पशू वैद्यकीय दवाखान्यात कायम स्वरुपी पशू वैद्यकीय कर्मचारी वर्ग नेमणूक करण्यात येवून पशुधन मालकाची होणारी गैरसोय टाळावी.अशी मागणी करण्यात येत आहे.याकडे संबंधित तालुका व जिल्हा पशू वैद्यकीय प्रशासन काय लक्ष देते.याकडे गावातील पशू मालकांचे लक्ष लागलेले आहे.
Tags
news
