शहादा (प्रतिनिधी) :- शहादा-तळोदा मतदारसंघातील तळोदा तालुक्यातील शेवटचे गाव आक्राणी महल येथे आमदार राजेश पाडवी यांनी भेट दिली व गावातील समस्या जाणून घेतल्या या वेळी उपस्थित नागरिकांनी गावात रस्ताची आडचन मोठ्या प्रमाणात असुन दळणवळणा पासुन वंचित असलेल्याने गावकरी यांनी म्हटले आमदार राजेश पाडवी स्वताहा दोन किलोमीटर पायपीट करत रस्तांची पाहणी केली व स्वखर्चाने रस्ता बनवुन देण्याचे सांगितले तसेच शाळेसाठी पक्की इमारत, पक्की बालवाडी, रेशनिंग दुकान, पिण्याच्या पाण्यासाठी नविन हेडपंप करणे,काही पाड्यावर लाईन नाही त्या ठिकाणी खाब बसवणे असे अनेक समस्या चा पाडा वाचला.
आमदार पाडवी म्हणाले कि, लवकर सर्व कामे मार्गी लागतील तसेच आक्राणी महल व मा राणीकाजल यांचे मंदिर लवकर पर्यटन मधे समाविष्ट करुन विकास कामे केली जातील या वेळी आ. पाडवी, तळोदा तालुका अध्यक्ष संरपच युनियन बळीराम पाडवी, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश दादा वळवी, अशोक वळवी, प. स. सदस्य विजय राणा, पं. स. सदस्य अनिल पवार, अदिवासी मोर्चा जिल्हा सचिव नारायण दादा ठाकरे, संरपच गोपी पावरा, विठ्ठलराव बागले, गणपत महाराज, सागदेव वळवी, सचिन पावरा, सायसिंग ठाकरे, लक्ष्मण ठाकरे, मोहन वळवी, मोना जेगला ठाकरे, रमेश ठाकरे, मानसिंग ठाकरे, रामसिंग वळवी, सुभाष वळवी, मुख्याध्यापक ठाकरे सर, शिडुताई केद्र प्रमुख स्वीय सहायक हेमराज पवार व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
news
