देशी पिस्तुल व मॅक्झिन सह एकास अटक 72 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत




शिरपूर प्रतिनिधी-  शिरपूर तालुक्यातील तालुका पोलीस स्टेशन सांगवी यांनी एका आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व मॅक्झिन सह 72 हजार 400 रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करून आरोपीस अटक केली आहे व आर्म ऍक्ट अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की कर्नाटक राज्यातील एका गुन्ह्यातील अटक आरोपीच्या मोबाइल फोनची तपासणी करत असताना तेथील पोलिस पथकास त्याच्या मोबाईल मध्ये एका इसमाच्या देशी बनावटीच्या पिस्तुलासह फोटो आढळून आला होता तेथील पोलिसांनी सदर आरोपी ची विचारपूस केली असता पिस्तुल बाळगणारा व्यक्ती महाराष्ट्र मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या एका गावातील असल्याची माहिती समोर आली होती व त्याचे नाव नामे रोहित आहे अशी माहिती प्राप्त झाली होती. सदर माहितीच्या आधारे कर्नाटक पोलिसांनी धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्याशी माहितीचे आदान-प्रदान करून कारवाईबाबत चर्चा केली होती.
 त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक धुळे यांनी तात्काळ तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना कळवून कारवाईबाबत मार्गदर्शन केले तालुका पोलीस स्टेशन कडून प्राप्त फोटो आणि वरून इसमाचा शोध सुरू केला असता सदर इसम हा रोहित नसून अरुण रावजी पावरा वय 19 राहणार जोयदा तालुका शिरपूर असल्याचे निष्पन्न झाले .यानुसार शिरपूर तालुका पोलिस स्टेशनचे अभिषेक पाटील यांनी एक पथक गठित करून दिनांक एक नोव्हेंबर रोजी रात्री 8  वाजेच्या सुमारास संबंधित अरुण पावरा यास त्याचे बजाज मोटर्स सायकल पल्सर क्रमांक एमपी 46 / एम एल 72 77 सह ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यातून मोटरसायकल च्या शीटच्या खाली एक देशी बनावटीचे पिस्तूल व त्यात मॅगझीन आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली तसेच आरोपीच्या मोबाईल फोन तपासला असता त्यामध्ये सुद्धा देशी पिस्तुलासह फोटो आढळून आले .अरुण पावरा यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पुढील प्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यात 12 हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि  मॅक्झिम 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन 50 हजार रुपये किमतीची पल्सर मोटरसायकल आणि 400 रुपये किमतीचे दोन जिवंत काढतो असा एकूण 72 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे .
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस सबइन्स्पेक्टर नरेंद्र खैरनार करत आहे सदरची कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधिक्षक चिन्मय पंडित सो,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव ,उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील पोलीस सब इन्स्पेक्टर नरेंद्र खैरनार ,दीपक वारे, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण गवळी ,संजय जाधव, योगेश दाभाडे ,योगेश मोरे ,गोविंद कोळी, रामदास बारेला इत्यादींच्या पथकाने केली आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने