नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून. नाशिक -:राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची पहिली बैठक विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात उत्साहात संपन्न झाली. प्रदेश अध्यक्ष इंजी. वैभव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश महिला संघटक सुलभा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे विभागीय कार्याध्यक्ष राजे गिरीशजी घोरपडे यांच्या महालात बैठक पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत सैनिक म्हणुन संताजी घोरपडे व धनाजी घोरपडे यांची इतिहासात नोंद आहे. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे प्रमुख निष्ठावंत सहकारी म्हणुन गिरीशजी घोरपडे यांची नोंद होईल यात शंका नाही असे गौरवोद्गार राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी बैठकीस video कॉल च्या माध्यमाने संबोधणं करताना केले . प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश सचिव रमेश देसाई, महिला प्रदेश अध्यक्षा सुजाता गुरव, सुभाष परदेशी हेमलता परदेशी, संतोष परदेशी, अर्चना कांबळे, नंदकुमार बोळे, सुनील परदेशी, गणेश जाधव, अॅड विरेंद्र ठाकूर, सुरेंद्र ठाकूर कामगार संघाचे अध्यक्ष धीरज महागरे , उपाध्यक्ष श्रीराम परदेशी, सचिव कैलास किटुकले, मुख्य घटक विलास सुतार आदी उपस्थित होते. यावेळी 2021 मध्ये संघ वाढीसाठी घेण्यात येणार्या उपक्रमा बाबत चर्चा करण्यात आली. सूत्रसंचालन रमेश देसाई केले तर आभार सुभाष परदेशी यांनी मानले. यावेळी सर्व सहकार्यासह विश्वगामी पत्रकार संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते
Tags
news
