शिरपूर साखर कारखाना सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांचे एकनाथ खडसे यांना साखडे



शिरपूर प्रतिनिधी- राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे शिरपूर दौऱ्यावर असताना शिरपूर तालुक्यातील समाजसेवेचे व्रत घेतलेल्या हेलपिंग हँड ग्रुप चे अध्यक्ष मयूर राजपूतआणि त्यांचे सहकारी मित्र आणि तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावतीने एकनाथराव खडसे यांना शिरपूर सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी निवेदन देऊन साकडे घालण्यात आले आहे.
 या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कणा असलेला शिरपूर सहकारी साखर कारखाना हा सन 2010 पासून बंद आहे त्यामुळे येथील शेतकरी अत्यंत बिकट आर्थिक संकटात सापडला आहे इतर पिकांना मनासारखा भाव मिळत नाही नैसर्गिक संकटामुळे पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी होते बाजार भाव गडगडतात त्यामुळे येथील शेतकऱ्यांना तारण्यासाठी ऊस पिकाचे उत्पादन हा एकमेव मार्ग आहे सध्या शिरपूर साखर कारखान्यावर सत्तारुढ असलेल्या संचालक मंडळाकडून कारखाना सुरू होणे विषयी कोणतेही प्रयत्न सुरू नाहीत. वेगवेगळी कारणे दाखवून या कारखान्याबाबत खुद्ध संचालक मंडळ नकारात्मक भूमिका घेताना दिसून येतात. त्यामुळे हा साखर कारखाना अवसायानात काढून भंगारात विकणे किंवा खाजगी उद्योगांकडे हस्तांतरित करणे अशा पद्धतीचे षड्यंत्र सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही .
 आपण उत्तर महाराष्ट्राचे सुजाण नेतृत्व आहात तापी खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण खान्देश ची भूमी सुजलाम सुफलाम केली विकास कामांची फळे मिळण्यात मात्र विघ्नसंतोषी लोकांमुळे अडथळा निर्माण झाला आहे .या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आपल्यालाच निर्णायक भूमिका घेऊन उभे राहणे भाग आहे म्हणून  आपल्याकडून आम्हा शेतकऱ्यांना खूप मोठ्या अपेक्षा असून तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरू शकणारा शिरपूर साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी आपण आपल्या स्तरावरून प्रयत्न करावे अशी विनंती या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे सदरच्या निवेदनावर अध्यक्ष मयूर राजपूत ,राकेश चौधरी, ईश्वर गवळी दिगंबर राजपूत ,देवीदास पाटील, कैलास दोरिक, मधुकर पाटील यांच्यासह तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या  सह्या आहेत

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने