पै सुरेश धनगर यांची पैलवान गृप महाराष्ट्रच्या धुळे जिल्ह्यातील सोनगीर शहर पदी नियुक्ती




सोनगीर - 
पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक/अध्यक्ष
पैलवान.मारुती(भाऊ) जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पैलवान व सौ कविता ताई कोळी महाराष्ट्र राज्य महिला संपर्क प्रमुख यांचे मार्गदर्शनाने पैलवान सनी वाडेकर,उत्तर महाराष्ट्र केसरी खान्देश प्रमुख,स्वामी दादा कुटे खान्देश संपर्क प्रमुख यांच्या उपस्थितीत
पैलवान ग्रुप धुळे जिल्हा सोनगीर शहर अध्यक्ष पदी पै सुरेश भाऊ धनगर यांची निवड करण्यात आली.तसेच याप्रसंगी राज्यातील कुस्ती क्षेत्रातील सर्व मल्लांच्या खुराकसाठी शासनाकडून अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न करू.व  शहरातील व गावात शासकीय खर्चातून व्यायाम शाळेसह कुस्ती खेळण्यासाठी लाल मातीचा हौदा तसेच मॅटची शासकीय खर्चातून व्यवस्था करण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करू असे आश्वासन नवनिर्वाचित अध्यक्ष पै सुरेश भाऊ धनगर यांनी उपस्थितांना दिले आहे.व कुस्ती क्षेत्रात मुलांना सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील राहील.असे देखील पै सुरेश धनगर यांनी नमूद केले आहे. पैलवान सुरेश धनगर यांची अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल त्यांच्यावर समाजातील सर्व स्थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने