शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिपावली मिलन व समन्वय सभा संपन्न



शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहर पोलीस स्टेशन यांच्या विद्यमाने व व शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व संपूर्ण पोलीस दल यांच्या माध्यमाने आज शिरपूर शहरात शिरपूर पोलीस स्टेशन येथे दीपावली मिलन व फराळ नाश्ता आणि समन्वय सभेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी शहरातील पत्रकार नगरसेवक, राजकीय पदाधिकारी पोलिस पाटील व शांतता कमिटीचे सदस्य इत्यादी लोकांना आमंत्रित करण्यात आले होते .सदर प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अनिल माने उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि समाप्ती पीएसआय संदीप मुरकुटे यांनी केले यावेळी दीपावली मिलन व समन्वय सभेचे आयोजन व आगामी काळात दीपावली सणानिमित्त सर्व धर्म समभाव व नियम व कायदे यांचे पालन करून पोलीस व प्रशासनाने आज आपल्या सर्वांच्या समन्वयातून साजरा करण्याच्या उद्देशाने व दीपावली मिलन म्हणून सदर कार्यक्रम आयोजित केल्याबाबत पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी माहिती देऊन मार्गदर्शन केले. यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक नगरसेवक पोलीस पाटील आणि पत्रकार यांनी आपले मतप्रदर्शन करून प्रशासन व नागरिक यांच्या समन्वयातून आनंदाने उत्सव साजरा करण्याबाबत व शासन नियमांचे पालन करणे बाबत चर्चा केली. यावेळी ही विचार-विनिमय सभा असून पोलीस प्रशासन याबाबत खुल्या मनाने चर्चा देखील संपन्न झाली. अनेक नागरिकांनी शहरातील मोटारसायकल चोरी रहदारीची समस्या निर्माण करणे इत्यादी बाबत चर्चा करून शहरातील प्रमुख समस्यांबाबत मत प्रदर्शन करून प्रशासनाकडून काही सुधारणा करण्याची गरज बोलून दाखवली, यावर पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दीपावली नंतर आपण सकारात्मक विचार करून याबाबत कार्यवाही करू असे नागरिकांना आश्वासित केले .
कार्यक्रमाच्या शेवटी उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले नागरिक आणि पोलिस यांच्या समन्वयातून कामकाज होणे बाबत व कोणतीही जबाबदारी ही फक्त पोलिसांचे नसून काही बाबतीत नागरिकांच्या लोकसभा देखील तेवढाच महत्त्वाचा असतो असे मत व्यक्त करून समन्वयातून काम करण्याबाबत त्यांनी मत व्यक्त केले. अनेक वर्षानंतर पोलीस प्रशासनाने अशाप्रकारचे दीपावली मीलन घडवून आणले व नागरिकांशी संवाद साधला म्हणून अनेकांनी पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने