शिरपूर – शिरपूर तालुक्यातील भरवाडे येथील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक चंद्रकांत पवार गावात कर वसुली व इतर आवश्यक कामासाठी गावात फिरत असतांना गावातील भिका नवल कोळी याने विकास कामावरून ग्रामसेवक चंद्रकांत पवार यांच्या कामात अडथळा निर्माण करीत अश्लील भाषेत शिवीगाळ व धक्काबुक्की करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शिरपूर शाखेकडून सदर घटनेचा निषेध करीत गटविकास अधिकारी वाय डी शिंदे यांना निवेदन देत संबंधित व्यक्ती विरुद्ध कायदेशीर कार्यावाही परवानगी मागण्यात आली होती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाय डी शिंदे यांनी सर्व माहिती जाणून घेतल्यावर संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली.त्यानुसार भरवाडे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक चंद्रकांत बी पवार यांनी भरवाडे येथील भिका नवल कोळी याच्या विरुद्ध तक्रार दाखल केल्याने शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दि.१० नोव्हेंबर रोजी भादवी ३५३, ३२६,५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Tags
news
