राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे शिरपूर शहरात भव्य स्वागत,खडसे यांची भाजप नेत्यांवर घणाघाती टीका



शिरपूर -  शिरपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले नेते एकनाथ खडसे यांच्या शिरपूर तालुक्यात विविध ठिकाणी जोमात स्वागत करण्यात आले असून शहरातील मनोमंगल लॉन्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे एकनाथ खडसे यांचे भव्य स्वागत करण्यात आले .यावेळेस धुळे जिल्हा व शिरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर प्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार अनिल अण्णा गोटे डॉक्टर जितेंद्र ठाकूर ज्योतीताई पावरा उत्तमराव महाजन मनोज महाजन ,दिनेश मोरे ,दादा सो, दिगंबर माळी, युवराज राजपूत यासह विविध नेते पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.या वेळी भाजप च्या हेमराज राजपूत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला या वेळी उत्तमराव महाजन, सौ जोती पावरा, आ.अनिल गोटे व एकनाथजी खडसे यांनी मनोगत व्यक्त केले .
या कार्यकर्ता मेळाव्यात माजी आ अनिल गोटे यांनी आपल्या शैलीत तुफान फटकेबाजी करून भाजप नेत्यावर तुफान टीका केली.त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका करताना सांगितले की मी त्यांचा फार मोठा घोटाळा या आठवड्यात बाहेर काढणार असून गल्ली पासून दिल्ली पर्यंत हालचाल व खलबली मचून जाईल असे सांगितले आहे. शिवाय खान्देशातील भाजप च्या एका बड्या माजी मंत्री असलेल्या नेत्याला 31 डिसेंबर पर्यंत तुरुंगात टाकेल असे आव्हान दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर खडसे प्रथमच शिरपूर मध्ये आले होते.यया वेळी आपले मनोगत त्यांनी व्यक्त केले .40 वर्ष पक्षाची सेवा करून खान्देशात पक्ष वाढवला.मात्र भाजप मधील काही नेत्यांनी माझ्यावर अन्याय केला व खानदेश का न्याय दिला नाही.मी पुन्हा येईन हा अहंकार मुळे भाजप सत्ते पासून दूर राहिला.आता भाजप भटजी ब्राम्हण चा पक्ष झाला असून यात कार्यकर्त्याला किंमत नाही. एका विशिष्ठ नेत्याची कमचगिरी करण्यात नेते धन्यता मानतात.त्यामुळे या पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढवण्याचे काम करणे व खान्देशातून भाजप चा सुपडा साफ करणे हाच आपला हेतू असेल व खानदेश च्या हितासाठी माझा पुढील राजकीय लढा असेल असे प्रतिपादन खडसे यांनी केले .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने