गोवंश संवर्धन एक काळाची गरज....




तसे पाहिले तर आपल्या भारतीय संस्कृतीने गोमातेला अतिशय उच्च स्थान देऊन भारताने गोमाता किंवा गोवंश संवर्धनाची गौरवशाली आणि वैभवशाली परंपरा कायमस्वरूपी अबाधित ठेवली आहे. यात तिळमात्र शंका मनामध्ये उपस्थित करण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं. गोमातेचे महत्त्व विशद करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे गोमाता तिच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत पर्यावरणाच्या किंवा निसर्गाच्या चक्रामध्ये विविध गोष्टींनी भर घालण्याचे महत्तम कार्य करत असते. आज आपण बघतो की आपला भारत हा कृषिप्रधान देश असून दिवसागणिक शेती संदर्भात वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत असतात. त्यात भूमीचे स्खलण असेल किंवा  पर्यावरणाचा -हास असेल, किंवा जमिनीची सुपीकता कमी होऊन तिच्या उत्पादकतेमध्ये घट होणे असेल या सर्व गोष्टींचा जर निसर्गाचे मानदंड समोर ठेवून अभ्यास केला गेला तर उपरोक्त गोष्टी घडण्यामागची मुख्य कारणे पुढील प्रमाणे दिसून येतील ते म्हणजे 

1. या पृथ्वीतलावर धाकदपटशाहीने मुंगी मारण्याचाही अधिकार नसलेल्या माणसाने बेसुमार पणे केलेले गाईंची कत्तल आणि त्यामुळे कमी झालेला गोवंश.

2. झपाट्याने कमी होत चाललेली गोवंश किंवा जनावरांची संख्या (अलीकडे नजीकच्या काळात देशी गाईंची संख्या अत्यंत कमी झालेली असेल हे भाकीत लपवून ठेवता येणार नाही.)

3. सध्या शेतकरी नगदी पिकाच्या नादात चराईसाठी पुरेशे क्षेत्र शिल्लक ठेवत नसल्यामुळे उन्हाळ्यात तीव्र चारा टंचाईचा सामना करावा लागतो आणि त्याचाच परिणाम म्हणून भूक बळीने अनेक जनावरे मृत्युमुखी पडतात व त्याचा सर्वतोपरी परिणाम शेती व्यवसायावर होतो.

4. जमिनीमध्ये शेणखताचा वापर न करता अति प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे ही सुपीकता जर पूर्ववत आणायची असेल तर गोबर आणि गोमुत्रचा वापर करावा लागेल. (त्यामुळे जमिनीतील नायट्रोजन व इतर पिकांच्या पोषणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांचा मातीमध्ये समावेश होऊन पिके जोमदार अवस्थेत दिसतील.)
        त्याचबरोबर जर प्रतिष्ठित व्यक्तींनी अथवा शासनाने गोवंश रक्षणासंदर्भात पुढाकार घेऊन गो शाळांना जास्तीत जास्त कशा पद्धतीने मदत करता येईल किंवा चराईसाठी राखीव क्षेत्राचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल आणि वैरण विकासाच्या कार्यक्रमास व्यापक स्वरुप कस मिळवून देता येईल व गोशाळांना कशा पद्धतीने शासनाच्या विविध उपक्रमांशी जुळवून घेता येतील यासंदर्भात विचार विनिमय केल्यास त्याचा अधिकाधिक फायदा शेतकरी, व्यक्ती आणि पर्यायाने समाजास होईल.
       आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणामुळे अलीकडे रासायनिक खते व कीटकनाशके वापरून शेती करण्यावर अधिकतम भर दिला गेल्यामुळे सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा लोकमानस कमी झालेला आहे ही गोष्ट आपल्या मेंदूमध्ये भिनवून जर आपण वेळीच गोवंशाचे संवर्धन केले नाही किंवा जतन केले नाही तर तो दिवस दूर नाही जो भविष्यामध्ये येणाऱ्या आपल्या पिढ्यांना शेण आणि गोमूत्र हे शेतात टाकने तर दूरच पण फक्त नाम मात्र शुल्क अदा करून नोंदणीकृत वस्तुसंग्रहालयातच पहावयास मिळेल.

लेखक :-  
चंद्रशेखर सुभाष बाविस्कर ( रा.बोराळे/मातकुट)
भ्र.ध्व. क्र. 9604766407

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने