विधान परिषद निवडणूक धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य प्राधिकारी मतदारसंघासाठी 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान : जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव



धुळे, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे तथा नंदुरबार स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान  होणार असून 3 डिसेंबर 2020 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडेल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. 
देशात कोरोना विषाणूमुळे (COVID19) होत असलेल्या संसर्गाचा प्रसार रोखणे, गर्दीची शक्यता टाळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने धुळे- नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची उर्वरित निवडणूक प्रक्रिया पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. 
भारत निवडणूक आयोगाच्या आजच्या अधिसूचनेअन्वये महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे तथा नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीचा उर्वरित कार्यक्रम घोषित केला आहे. तो असा : मतदानाचा दिनांक- मंगळवार 1 डिसेंबर 2020. मतदानाचा कालावधी- सकाळी 8 ते सायंकाळी 5. मतमोजणी दिनांक- गुरुवार 3 डिसेंबर 2020. ज्या दिनांकापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे तो दिनांक- सोमवार 7 डिसेंबर 2020. वरील बाबींची सर्व उमेदवार, सर्व मतदार, जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले आहे. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने