नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे. नाशिक - राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री उध्दव ठाकरे सो.यांनी राज्यातील मंदिरे सुरु करुन सर्वच धार्मिक बाबीवर उपजिविका करणारे व्यावसायीक व सर्व वारकरी संप्रदायीक कार्यक्रम सुरू होणार असल्याने सर्व च थरातील धार्मिक लोकांचा दुवा घेतला आहे. आम्हा सर्वच किर्तनकार वारकरी भाविकांना गेली आठ महिने खुपच आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.मंदिरे चालु झाल्याने सर्वच लोक आनंदीत झाले आहेत. महाराष्ट्र वारकरी महामंडळ नाशिक जिल्ह्याचे वतीने महाराष्ट्र शासनाचे आम्ही सर्व जिल्हा भरातील वारकरी अभिनंदन करून आभार मानतो असे जिल्हाध्यक्ष हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर यांनी म्हटले आहे. पत्रकावर जेष्ठ मार्गदर्शक हभपश्री रामकृष्ण महाराज लहवीतकर,मार्गदर्शक प्रमुख हभपश्री श्रावण महाराज आहिरे, जिल्हा कार्याध्यक्ष हभपश्री बाळकृष्ण महाराज ठोके शास्री, उपाध्यक्ष हभपश्री सुभाष महाराज बच्छाव,जिल्हा उपाध्यक्ष हभपश्री चंद्रकांत दादा आहेर, जिल्हा उपाध्यक्ष हभपश्री माधव महाराज शास्री घोटेकर,कोषाध्यक्ष हभपश्री बाळासाहेब महाराज कबाडे, कोषाध्यक्ष हभपश्री पांडुरंग पा.गडकरी,कोषाध्यक्ष हभपश्री दत्तात्रय पा.डुकरे,कोषाध्यक्ष हभपश्री पुंडलिक महाराज खडकतळेकर,सचिव हभपश्री जालिंदर महाराज दराडे,संपर्कप्रमुख हभपश्री कैलास महाराज देशमुख,हभपश्री भिमाशंकर राऊत युवा जिल्हाध्यक्ष हभपश्री संदिप महाराज खकाळे, युवाजिल्हा कार्याध्यक्ष हभप शुभांग महाराज घोटेकर शास्री यांच्या शुभेच्छा आहेत मंदिरे सुरु व्हावीत या करीता प्रदेशअध्यक्ष हभपश्री कृष्णाजी महाराज रांजणे,प्रदेशकार्याध्यक्ष हभपश्री रामेश्वर महाराज शास्री हे सातत्याने पाठपुरावा करत राहिल्याने व कोरोणा संकट कमी झाल्याने मंदिरे सुरु करता आली असे मत मार्गदर्शक समितीचे अध्यक्ष हभपश्री श्रावण महाराज आहिरे व सदस्य हभपश्री नरेंद्र महाराज गुरव यांनी व्यक्त केले आहे.
Tags
news
