मनसे तर्फे शिरपुर येथे NHAI 3 रस्त्याच्या खड्ड्याच्या विरुद्ध प्रतिकात्मक स्विमिंग पूल आंदोलन .. मनसे पदाधिकारी यांना अटक




   

  
आज दिनांक १/०१/२०२० रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने शिरपुर येथे आज नाविन्यपूर्ण आंदोलन करण्यात आले एन एच आय अंतर्गत असलेल्या एन एच थ्री नॅशनल हायवे तसेच डीपी टी एस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना  रस्त्याची दुरवस्था साठी अनेक वेळेस दूरध्वनीवरून संपर्क करून रस्त्याची दुरुस्ती ची मागणी केली होत असताना सदर अधिकाऱ्यांनी ही बाब लक्षात न घेता कानाडोळा केला म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून .५/०९/२०२ रोजी निवेदन सादर केले होते निवेदनात रस्त्याची दयनीय अवस्था खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे झाले आहे असा सवाल करण्यात आला होता हजारो संख्येने खड्डे पडल्याने अनेक लोकांचा जीव हानी होत आहे सर्वसामान्य माणसांचा जीव धोक्यात आला असून देखील खड्डे असतानाही टोल वसुली कशाला असा सवालही निवेदनात करण्यात आला होता पण निवेदनाची ही भाषा शिरपूर पळासनेर टोल प्लाझा यांच्या लक्षात आली नाही तुम्हाला तसेच तसेच निवेदनाच्या कार्यवाहीचे पत्रसुद्धा मिळाले नाही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रतिकात्मक स्विमिंग पूल आंदोलन करन्यात आले पावसाचे पाणी साचलेल्या मोठ्या खड्याना स्विमिंग पूल घोषित करून nhai च्या स्थानिक कंपनीचे नाव देण्यात आले आंदोलन  करण्यात आले खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये होणारी जीवित वित्तहानी याला संबंधित कंपनी जबाबदार असून निवेदन दिल्यापासून खड्ड्यांमुळे कोणाचाही दिवस किंवा वाहनात अपघातामुळे हानी झाल्यास संबंधित कंपनी जबाबदार राहील तसेच पोलीस पंचनामा नुसार जबाबदार कंपनीला भरपाई देण्यासाठी प्रसंगी कायदेशीर बाबांसाठी मनसे कोर्टात देखील जाऊन अपघातग्रस्तांना न्याय मिळवून देईल आता दुरुस्तीचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसुली करण्यात येऊ नये असे सूचना संबंधित कंपनीला आंदोलन कार्यकर्त्यांनी दिलेला आहे परंतु टोल वसुली सुरूच आहे म्हणून मनसे यानंतरचे आंदोलन तीव्र स्वरूपाचे करून प्रसंगी न्यायालयात देखील जाण्याची तयारी आहे म्हणून संबंधित कंपनीने सर्व बाबींकडे त्वरित लक्षात घेऊन रस्ता दुरुस्तीसह तापी पुलावरील होणाऱ्या अपघात व सांगवी पळासनेर कडे जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांचा होणाऱ्या अपघात याला कंपनी जबाबदार असल्याचे आरोप मनसेतर्फे करण्यात आलेला आहे तसेच तापी पुलावरील  खड्डे टाळण्यासाठी अनेक कारचालक ट्रक चालक प्रयत्न करीत असतात पण येत्या सहा महिन्यात अनेक ट्रक  पुलाच्या खाली जाऊन पडल्यात यात अनेक व्यापारांचा मालाचा नुकसानही झाला व चालकाला खूप वेदना व गंभीर जखमी झाल्यामुळे त्याच्या कुटुंब रस्त्यावर येऊन ठेपले सदऱ्याच्या जबाबदार आहे यापूर्वी नरडाणा येथे टोल नाका होता तापी नदीवरील पूल बनविल्यामुळे टोल बसविण्यात आला होता त्याची वसुली संपूर्णपणे जनतेकडून झालेली आहे तरीदेखील सदर कंपनी दुबार वसुली करत आहे आठ पर्यंत तापी नदीवरील झालेल्या सर्व अवजड वाहनांचे अपघात जुन्या फुलांवरून झालेले आहेत वसुली करताना दुतर्फा वसुली का केली जात आहे यापूर्वी सावरदे येथील जुना पूल दुरुस्ती व कठडे मजबूत करण्याचे काम कंपनीत ने केले पाहिजे कारण तापी नदीचा एक पूल नवीन व एक पूल जुना असून पुलाचे कठडे बरी व भक्कम व दुसऱ्या पुलाचे कठडे कमकुवत कशाला ? म्हणजेच  सर्व सामान्य माणसाचा जीव जावा असेच मत N ,H ,I, अंतर्गत प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा असावा असा आरोप मनसेकडून करण्यात आला व पुढील दहा दिवसात जर रस्त्याचे दुरुस्तीचे काम झाले नाहीत भविष्यात मनसे कडणा दे दनादन दे दनादन अनोखे आंदोलन करण्यात येईल असा इशारा पदाधिकारी यांनी दिला आजच्या  आंदोलन प्रसंगी सांगवी येथील उपनिरीक्षक अभिषेक पाटील कॉन्स्टेबल गवळी तसेच सर्व पोलीस बंदोबस्तात आंदोलन करण्यात आले तसेच आंदोलन प्रसंगी मार्क्स व सोशल डिस्टन्स नियमाचे पालन करण्यात आले या आंदोलन करते वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे  राकेश नवनीत चौधरी, उपजिल्हाध्यक्ष मनसे  पुनमचंद आनंदा मोरे धुळे जिल्हा उपाध्यक्ष मनविसे, चेतन विजय सिंग राजपूत शिरपूर शहराध्यक्ष, प्रदिपदादा दहिवदकर जिल्हा प्रवक्ता ,अतुल बडगुजर शहर उपाध्यक्ष, आबिद कुरेशी शहर उपाध्यक्ष, राहुल बेलदार शहर उपाध्यक्ष, गणेश मराठे शहर उपाध्यक्ष, मुकेश माळी शहर सचिव, व दीपक चौधरी, आसिफ शेख, सद्दाम शेख, रमेश भिल, अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने