शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पुरवठादार निकृष्ट डाळीच्या पुरवठा करत असून याबाबत सविस्तर चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष शिरपूर तालुका यांच्यावतीने गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
यामध्ये त्यांनी शिरपूर तालुक्यात शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत मध्यान भोजन योजना अंतर्गत पोषण आहाराचा पुरवठा करणारा धुळे जिल्ह्यातील गणेश इंटरप्राईजेस चे मालक पवन अग्रवाल यांना शालेय पोषण आहार पुरवठा करण्याचे कंत्राट शासनाने दिले आहे .दिनांक 23 सप्टेंबर 2020 रोजी जिल्हा परिषद केंद्र शाळा तरडी येथे सदरील पुरवठादाराने जून ते ऑगस्ट 2020 या महिन्यांच्या पोषण आहाराचे धान्य शाळेत देण्यासाठी आले असता सदर आहारातील मुगदाळ, चवडी हे निकृष्ट दर्जाची होती. त्यादिवशी सदरील पुरवठादाराने तालुक्यातील इतर शाळांना देखील या मालाचा पुरवठा केला आहे. बहुतांश शाळांनी सदरच्या आहार पुरवठादारांकडून उतरवून घेतला आहे परंतु तरडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे शाळेतील मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,व सदस्य यांनी सदरील मूग डाळ व चवळी निकृष्ट दर्जाचे असल्याने ते परत केले आहे .
सध्या राज्यात covid-19 च्या संसर्ग मुळे शाळा बंद असल्याने आहार शाळेत शिजवणे बंद आहे त्यामुळे मुलांना धान्य स्वरूपात आहार वाटप केले जात आहे द
सदरील पुरवठादाराने शिरपूर तालुक्यातील बहुतांश शाळांना निकृष्ट दर्जाचे मूग डाळ आणि चवळी चा पुरवठा करून मुलांना खाण्यास योग्य नसलेला आहार पुरवला आहे त्यामुळे सदरच्या प्रकारात ठेकेदार यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे .मुलांचे पोषण व्हावे कुपोषणाच्या प्रमाणात घट यावी यासाठी शासनाने ही योजना सुरु केली असून या योजनेत ठेकेदार स्वतःची निकृष्ट अन्नाचा पुरवठा करून भ्रष्टाचार करत आहे .
covid-19 ची परिस्थिती असतानादेखील चांगल्या प्रतीचे धान्य पुरवठा करणे गरजेचे असताना लहान बालकांच्या जीवाशी खेळ करून मुलांच्या आरोग्याच्या कोणताही विचार न करता स्वार्थासाठी गैरव्यवहार केला आहे .तरी जून ते ऑगस्ट 2020 या कालावधीच्या पोषण आहाराच्या मालाची चौकशी करून यातील दोषी ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी व शासनाने त्याचा ठेका रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे याबाबत तक्रारीच्या प्रति शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, शिक्षण संचालक जिल्हाधिकारी धुळे ,मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे इत्यादींना देण्यात आली आहे
Tags
news
