उद्यमशील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने वाचन प्रेरणा दिवस साजरा के डी नाईक ह्यांच्या कडून अभ्यासिकेला हजारोंच्या पुस्तके भेट




:शहादा तालुक्यातील बामखेडा येथील उद्यमशील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉ ए पि जे अब्दुल कलाम ह्यांच्या जयंती निमित्ताने वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला .
सदर कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी कृषी पर्यवेक्षक श्री के.डी.नाईक.उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्या श्रीमती अरुनाताई पवार व माजी पोलीस पाटील ताराचंद गवळे आदी प्रमुख अतिथी म्हणून  उपस्थित होते .कार्यक्रमाची सुरुवात डॉ कलाम ह्यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाले. कार्यक्रमाच्या सुरवातीला आलेल्या मान्यवरांचे संस्थेच्या वतीने श्री ताराचंद गवळे ह्यांनी श्री के डी नाईक ह्यांचे स्वागत   व सत्कार केला त्यांनतर श्री .के .डी
 नाईक ह्यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व तरुण मित्राना विविध स्पर्धा परीक्षांची माहिती देऊन त्या संदर्भातील सर्व अद्ययावत पुस्तके भेट स्वरूपात दिली.श्री नाईक ह्यांनी दिलेल्या हजारोंच्या पुस्तकांमुळे वाचक तरुण मित्रांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद दिसून येत होता .कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री ताराचंद गवळे ह्यांनी सर्व विद्यार्थी मित्रांना भावी भविष्याच्या शुभेच्छा दिल्या .अभ्यासिकेला विविध पुस्तकांची भेट दिल्याबद्दल सर स्तरावरुन श्री नाईक ह्यांचे विशेष कौतुक केलं जातं आहे .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन सुशील गव्हाणे ह्यांनी केले .
*बामखेडा प्रतिनिधी  श्रावण पटेल*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने