जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री रावेरात चार भावंडांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने जळगाव जिल्हा आणि रावेर तालुका प्रचंड हादरला आहे.रावेर बोरखेडा रस्त्यावरील शेत शिवारामध्ये ही घटना घडली आहे. महेताब भिलाला हे पत्नी आणि पाच मुलांसह (तीन मुले, दोन मुली)सह राहतात. दरम्यान मध्य प्रदेश येथे नातेवाईकांच्या मयताला गेले असताना घरी दोन मुले आणि दोन मुली होत्या. मध्य रात्री झोपेत असतांनाच अज्ञातांनी कुऱ्हाडीने चौघ्या भावंडांची निर्घुण हत्या केली. या घटनेने रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु आहे. मात्र या घटनेची वार्ता पसरताच परिसरात शोक कळा पसरली असून पोलीस तपास नंतरच या मागील अंतिम सत्य समोर येणार आहे.
Tags
news
