शिरपूर तालुक्यातील 30 आधार केंद्र सुरू करण्यात यावे या साठी आज दि 16 रोजी शिवसेनेच्या वतीने तहसीलदार शिरपूर यांना निवेदन देण्यात आले .
शिवसेना धुळे - नंदूरबार संपर्क प्रमुख मा.बबनराव थोरात साहेब व धुळे जिल्हाप्रमुख(ग्रामीण)-मा.इंजि. हेमंत साळुंखे रावसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले .
शिरपूर तालुका आणि शहरातील आधार नोंदणी व आधार अपडेट करणेसाठी मोठ्याप्रमाणात गैरसोय होत आहे.शासनाच्या लोककल्याणकारी योजनांच्या लाभ मिळणेसाठी आधार कार्ड अत्याआवक्ष्यक कागदपत्रे असून शासकीय योजना,शेतकरी,बँकिंग,शैक्षणिक, आदिवासी बांधवांची योजना किंवा इतर कामासाठी आधार नोंदणी करणे आवश्यक आहे.शिरपूर तालुक्यातील शासकीय व खाजगी आधार केंद्र बंद स्थितीत आहेत.सद्या ग्रामीण भागात २ व शहरात १ आधार केंद्र सुरू आहे.परंतु सदर आधार केंद्रावर मोठया प्रमाणात गर्दी असल्याने जनतेची गैरसोय होत आहे.
.शिरपूर शहरासाठी १० व तालुक्यासाठी २० आधार केंद्र सुरु करण्याचे आवश्यता आहे.तरी जुने आधार नोंदणी केंद्र पुन्हा कार्यरत करून शिरपूर शहर व तालुक्यासाठी ३० आधार नोंदणी केंद्र त्वरीत सुरू करण्यात यावे ह्यानंतर आम्ही शिवसेना मार्फत माननीय जिल्हाधिकारी साहेबांना धुळे येथे निवेदन देणार आहेत आणि जर आधार नोंदणी त्वरित सुरू केले नाही तर आम्ही सर्व शिवसेना प्रमुख पदाधिकारी व शिवसेना अंगीकृत संघटना मिळून तिव्र आंदोलन शिवसेने स्टाईलने छेडू असा इशारा देण्यात आला आहे .
आज शिरपूर तालुक्यातील उपस्थित शिवसेना,युवासेना,महाराष्ट्र वाहतूक सेना, शिव वाहतूक सेना, एसटी कामगार सेना, महिला आघाडी तसेच शिवसेना अंगीकृत संघटना, पुढील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.त्यावेळी उपजिल्हा प्रमुख-श्री.भरतभाऊ राजपूत,तालुका प्रमुख:-इंजि.अत्तरसिंग पावरा, श्री.दिपकभाऊ चोरमले ,शहर प्रमुख- श्री.मनोजभाऊ धनगर, तालुका संघटक- श्री.योगेशभाऊ सूर्यवंशी,शिव वाहतूक सेना उपजिल्हा प्रमुख -अनिकेत बोरसे,उपशहर प्रमुख-श्री.बंटी लांडगे,श्री.योगेशभाऊ ठाकरे,विकास महिर राव,सिद्धार्थ बेसाणे ,उपतालुका प्रमुख-पंकज पाटील,शिव वाहतूक सेना-तालुका प्रमुख-मसूदभाई शेख,शहर प्रमुख-बबलुशेख,महाराष्ट्र वाहतूक सेना शहर अध्यक्ष-श्री.दिनेश गुरव,उपशहर अध्यक्ष-अशोक मिस्त्री,तुषार महाले,शिवसेनिक-किरणभाऊ मोरे,विजय पावरा,सुकलाल पावरा, तुकाराम भिल,राहुल पावरा, दिलीप पावरा , आकाश जाधव,अझीम पठाण,किरण मोरे,जाविद शहा,विजय पवार, महेश मिसे,अमोल मानवर, दिपक धनगर,हिरालाल मिस्त्री आदि शिवसेनिक उपस्थित होते.*
Tags
news
