शिरपूर शहरातील नामांकित गंगाई हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक गिरासे यांना गौरव फाउंडेशन शिरपूर यांच्यातर्फे सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीला धरून आपण वैद्यकीय क्षेत्रातील देवदूत नेहमीच रुग्णांसाठी संकटाच्या वेळी धावून जात असतात आणि तेच काम कोरोना काळात धकाधकीच्या वातावरणात अक्षरशः तळहातावर शिर घेऊन अत्यंत हिमतीने आपण रुग्णांसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शिरपूर पंचक्रोशीतील विविध रुग्णांना सेवा देऊन त्यांना रोगमुक्त करून अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली आहे सारा देश बंद असताना रात्रंदिवस तुम्ही आणि तुमचे सहकार्य रुग्णांच्या सेवेत कार्यमग्न होते याच्या आम्हास सार्थ अभिमान आहे आणि यामुळे आपण कोरोना सारख्या आजाराला नियंत्रित करू शकलो म्हणून तुम्हाला हे सन्मानपत्र कृतज्ञतापूर्वक जाणीव पुरस्कार स्वरूपात प्रदान करीत आहोत.
तुमच्या हातून अशीच देशसेवा घडत राहो या अपेक्षे सह तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशा शब्दात सन्मानपत्र वर वर्णन केलेली असून डॉक्टर दीपक गिरासे यांचे संस्थेचे अध्यक्ष मोहनदास भांमरे व सचिव डॉक्टर जितेश पोद्दार यांनी स्वागत केले आहे .
डॉक्टरांच्या या सन्मानाबद्दल युथ फ्रेंड सर्कल , नेताजी केबल नेटवर्क व मित्रपरिवाराने अभिनंदन केले आहे.तसेच डॉक्टर असोसिएशन यांनी अभिनंदन केले आहे
Tags
news
