अजंदे बु! होळनांथे येथील भोई समाजाची 40 वर्षांची प्रलंबित मागणी पूर्ण,



 

अजंदे बु! होळनांथे येथील भोई समाजाचे कुलदैवत चौधरा आई यांच्या देवस्थान निर्मितीसाठी भूपेश नगर (ग्रा. पं अजदें बु ) येथे 1000 स्क्वेअर फूट  जागा उपलब्ध करून देण्यासाठी मा.सरपंच चंदू भाऊ पाटील व सर्व ग्रा .पं. सदस्य मंडळी यांनी एकमुखी निर्णय घेऊन समस्त अजंदे बु! व होळनाथे येथील भोई समाजाचा गेल्या 40 वर्षापासुन प्रलंबित असलेल्या प्रश्न सोडवून दिलेला शब्द पूर्ण करून आपले कर्तव्य व वचन पूर्ती केली आहे.सर्व समाज बांधवांनी  आभार मानुन सर्व समाज आता सोबत राहुन काम करुन असा निर्धार केला आहे.
     मा. आ अमरिशभाई पटेल साहेब आ.दादासो काशिनाथ दादा पावरा साहेब मा.भाईसो. भुपेश भाई पटेल  यांच्या मार्गदर्शनाखाली
 व सरपंच चंदुभाऊ पाटील युवा नेते तनविर भाऊ शिंपी साहेब यांच्या अथक प्रयत्नाने व मदतिने  या मंदिर निर्माण च्या कार्यक्रमासाठी मुर्त स्वरूप देण्यासाठी योगदान देण्याचे आश्वास दिले आहे.
या मुळे भोई समाजाची 40 वर्षांची प्रलंबित मागणी पूर्ण झाली असून सर्वांच्या मदतीने भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प करण्यात आला असून  ही जागा उपलब्ध करून दिली म्हणून ग्रामपंचायत   व सर्वांचे आभार मानले आहेत.
 कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रास्ताविक प्रदिप वारुळे सर यांनी केले तर आभार इंजिनिअर ईश्वर ढोले 
 यांनी मानले
 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने