शिरपूर तालुक्यातिल कळमसरे येथे घरात बनावट चलनी नोटा बनवणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हा शाखेच्या धुळे पथक व शिरपूर शहर पोलीसांनी पर्दाफाश केला असून बनावट नोटा बनवण्यासाठी लागणाऱ्या साधनसमुग्रीसह 48 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना गुपीत माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा शाखेचे पथक व शिरपूर शहरात दाखल होऊन शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पथक दि 27 रोजी सायंकाळी 3:10 वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथे दाखल झाले तेथे सापळा रचून संतोष गुलाब बेलदार याच्या घरावर छापा टाकला असता पोलीसांनी छापा टाकल्याचे समजल्याचे लक्षात आल्याने घराच्या मागच्या खोलीत आणखी एक संशयित गॅस ओट्यावर बेसिन मध्ये काही तरी जाळत असल्याचे निदर्शनास आले ते ते पोलीसांनी बघितले असता तेथे राख व भारतीय चलनाच्या नोटांसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या 200 रुपय दराच्या चलनी बनावट नोटांचे तुकडे व जळालेले अवशेष मिळुन आले.सदर संशयिताला ताब्यात घेत त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव गुलाब बाबु बेलदार रा.कळमसरे असे सांगितले. या नुसार पोलिस पुढील तपास करत आहेत
Tags
news
