रोनक जैन / प्रतिनिधी
बळसाणे : साक्री तालुक्यातील दुसाणे सर्कलात १९ गावांचा समावेश असल्याने बळसाणे हे गाव सज्जेच गाव म्हणून ओळखले जाते या सर्कल मध्ये मंडळ आधिकारी व तलाठी किती दिवस येतात यांची चौकशी संबंधित विभागा मार्फत व्हावी अशी मागणी शिवसेना उपतालुका प्रमुख व बळसाणे ग्रा. पं. सदस्य महावीर जैन यांनी केली आहे.
बळसाणे हे सजेचे गाव आहे या गावात ७ ते ८ हजार लोकसंख्या असल्यामुळे कढरे,सतमाने, आगारपाडा हे तीन गावाची शिवार बळसाणे गावाला जोडलेली आहेत तिन्ही गावांची लोकसंख्या साधारणतः पंधरा ते वीस हजाराच्या आसपास आहे. एका आठवड्यातून एक दिवस तलाठी यांचे पाय लागत असल्याचे महावीर जैन यांच्यासह शेतकऱ्यांनी सांगितले जर आठवड्यातून एकदा ही आलेत तर फक्त १ ते २ तासाचे काम आपटून लगेच साक्री कडे धुम ठोकत असल्याची ओरड शिवसेनेचे महावीर जैन यांच्यासह नागरिकांनी केली आहे जर महसूल विभागाकडून असले अडसळपणा होत असेल तर शेतकऱ्यांची
काम कसं होणार हा चिंतेचा विषय बनला आहे विद्यार्थ्यांचे किंवा शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन उताऱ्याची किंवा काही कागदपत्रांना स्वाक्षरी लागते फक्त स्वाक्षरी घेण्या साठी साक्री गाठावे लागत असेल तर गावाला कशासाठी तलाठ्याची नेमणूक केली असा प्रश्न ग्रामस्थांना सतावतो आहे पिककर्ज किंवा पिकविमा व शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी ऑनलाइन उतारे लागत असतात परंतु शेतकरी कडे ऑनलाइन उतारे नसल्यामुळे बरेच शेतकरी बांधवांना या योजनांपासून वंचित राहण्यासाठी सामोरे जावे लागत आहे.शेतकऱ्यांपुढे एका मागून एक संकटे उभे असून ही संबंधित खात्याला शेतकरी व विद्यार्थ्यांवर मेहर नजर होत नसल्याची खंत जैन यांनी व्यक्ती केली ऑनलाइन उतारे करा अशी मागणी साक्री तहसीलदारा कडे करण्यात आली होती परंतु यागोष्टी कडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले असल्याचे जैन यांनी सांगितले म्हणून या सगळ्या गोष्टी पासून शेतकरी कधी वंचित राहत असेल तर तलाठी हलगर्जीपणा करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही.
प्रत्येक वेळेस संबंधित विभागाकडे मागणी करावी लागत आहे की कायमस्वरूपी तलाठ्याची नेमणूक करा अशी मागणी वारंवार करून ही संबंधित खाते अक्षरशः निद्रावस्थेत असल्याचे दिसून येत आहे यदाकदाचित तलाठ्याची नेमणूक झाली तर नव्याचे नऊ दिवस येतात आणि आपली हुकूमशाही बजावत साक्री येथे बसून काम सांभाळतात ..काही शेतकरी बांधवाना बाकी च्या गोष्टींची समज नसल्याने अशा भोळवट शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तर देऊन वापस करत राहतात उद्या ये परवा ये असं सांगून काही शेतकरी ३,४ महिन्यापासून कामा साठी अजून फिरत आहे म्हणून आता कधी काम केले नाही तर यापुढे अशी हुकूमशाही करत असाल तर शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा शिवसेना उपतालुका प्रमुख महावीर जैन यांनी दिला आहे.
Tags
news
