अमरिशभाई आर. पटेल सीबीएसई स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकद्वारे संसद भवन कार्याचा अनुभव

 



शिरपूर : दि शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचालित अमरिशभाई आर. पटेल सीबीएसई स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकद्वारे संसद भवन कार्याचा अनुभव देण्यात आला.

अध्ययन- अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी होण्यासाठी उपक्रमयुक्त शिक्षण महत्वाचे असते, याच उद्देशाने विद्यालयात उपक्रम आठवडा राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत 'मॉक पार्लमेंट' या उपक्रमातून संसद भवन मध्ये होणाऱ्या कार्याचा व चर्चेचा प्रत्यक्ष अनुभव प्रात्येक्षीकाव्दारे विद्यार्थ्यांना देण्यात आला.
शाळेचे प्राचार्य निश्चल नायर व उपप्रचार्या अनिता थॉमस यांनी माता शारदेच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. विद्यार्थ्यांमध्ये शासन नियमानुसार योग्य ते सुरक्षित अंतर राखून त्यांना 'मॉक पार्लमेंट' (संसद प्रतिमारुप) उपक्रमामध्ये प्रत्यक्ष सहभागी करण्यात आले. या प्रतिमारुप संसद मध्ये इयत्ता ८ वी, ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांनी सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष यांच्यातील नेत्यांची भूमिका साकारून उत्कृष्टरित्या वास्तविक भासणारी चर्चा घडवून आणली. यात सत्ताधारी पक्ष नेत्यांची भूमिका सौहार्द गुप्ता, जगदीश महाजन, सिद्धी अग्रवाल, अनंत मराठे, तस्निम अन्सारी, तेजस सोनवणे या विद्यार्थ्यांनी साकारली तसेच विरोधी पक्षनेत्यांची भूमिका जीनेश जैन, निखिल चौधरी, सलोनी पाटील, श्रेयश बाफना, मैत्र्ये डोंगरे, रुद्रेश गांगुर्डे या विद्यार्थ्यांनी साकारली. संसद अध्यक्ष म्हणून आर्या शिदखेडकर हिने तर सरचिटणीस म्हणून आनीनंद याने भूमिका साकारली. ओम भदाणे याने स्थानिक सरकार विषयी माहिती दिली तर राज्य सरकार विषयी तनुश्री पाटील हिने माहिती दिली व केंद्र सरकार विषयी अनोखी चांडक हिने माहिती सांगितली. या सर्वच विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे आपली भूमिका साकारून उपस्थितांची मने जिंकली. सूत्रसंचालन अक्षदा शिंपी या विद्यार्थिनीने खूप प्रभावीपणे केले. प्रास्ताविक समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख सौ. भारती सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रसारण ऑनलाईन झूम अप द्वारे व यूट्यूब चॅनल व्दारे शाळेच्या सर्व वर्गांची करण्यात आले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने