शिरपूर : आर. सी. पटेल विज्ञान सिनिअर महाविद्यालयातील प्रा. डॉ. सुनील पाटील व श्रीमती अर्चना पाटील (कुरुकवाडेकर) यांचा चिरंजीव दक्ष सुनील पाटील याने वैद्यकीय प्रवेश (नीट) परीक्षेत ७२० पेकी ६२१ गुण मिळवून लक्षणीय यश संपादन केले. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शिरपूर येथील आर. सी. पटेल इंग्लिश मेडीअम स्कूल व स्वामी विवेकानंद ज्यु. कॉलेज दहिवद मध्ये झाले आहे.
वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी त्याने कोटा (राजस्थान) येथील एलेन कोचिंग सेंटरचे शिक्षक, आर. सी. पटेल इंग्लिश मेडीअम स्कूल शिक्षक व स्वामी विवेकानंद ज्यु. कॉलेज दहिवदच्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
त्याच्या यशा बद्दल माजी शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, संस्था उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील, उपप्राचार्य अनिल सोनवणे, स्वामी विवेकानंद स्कूलचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील व शिक्षक यांनी कौतुक केले.
Tags
news
