शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरात काल परवा झालेल्या अवकाळी पावसामुळे रस्त्यावरील पाणी जनता नगर व भरती नगर मधील हनुमान मंदिर व रहिवासी घरात गेल्याच्या प्रकार समोर आला याबाबत या प्रभागातील नगरसेवक आणि नागरिक यांनी आक्षेप घेतला असून या प्रभागात काम करणाऱ्या संबंधित ठेकेदार त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सचिन निकम ,प्रभागाचे नगरसेवक राजू अण्णा गिरासे, उदय सुतार, राधे पावरा, अतुल पाटील ,जनता नगर भरतसिंग नगर मधील, नागरिक यांच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे सदरच्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की जनता नगर मधील हनुमान मंदिर व रहिवासी घरांसमोर नगरपालिकेचे रोडचे काम करण्यासाठी ठेकेदारास काम दिले होते परंतु ते काम करत असताना करत असताना ठेकेदार यांनी कामाची समांतर रेषा न घेता मजुरांना त्यांच्या पद्धतीने निकृष्ट दर्जाचे चढ-उतार करून रस्त्याचे काम करण्यात आले त्यामुळे पावसाचे पाणी ,गटाराचे पाणी सरळ हनुमान मंदिर व शेजारी रहिवासी घरात शिरत आहे .यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला असून मंदिराचे पावित्र्य देखील धोक्यात येत आहे .याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप असून नागरिकांच्या भावना दुखावल्या जात आहेत म्हणून या निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे तरी त्या ठेकेदाराची चौकशी करून सदर काम दुरुस्त करण्याबाबत आदेश करण्यात यावेत या मंदिराचा जीर्णोद्धार करावा अशी मागणी करण्यात आली आहे याबाबत तात्काळ कार्यवाही न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे
Tags
news
