उदगीर प्रतीनिधी राहुल शिवणे
उदगीर तालुक्यातील धोंडीहिप्परगा येथील शेतकरी बिरादार संभाजी बांबूराव,बिरादार शंकुतला दत्तात्रय है शेतकरी गेली तीन महिने झाली शेती कर्जसाठी भारतीय स्टेट बँक व्यवस्थापक अधिकारी यांच्या कडे जात आहेत व त्यांनी सांगितलेले कागदपत्रे वेळेवर देवुन सुध्दा जाणून बजूण शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी अडणूक करत आहे व कागदपत्रे घाळ करून तुम्ही कागदपत्रे दिले नाही व तुम्हाला कर्ज देणार नाही तुम्हाला कुठे जायचं तिथे जावा म्हणून शेतकरी बिरादार शंकुतला ,व संभाजी बिरादार यांना म्हणून बँकेतुन बाहेर काढले विषेश म्हणजे भारतीय स्टेट बँक नी धोंडीहिप्परगा है गाव दत्तक घेतला आहे शेतकऱ्यांना न्याय मिळावे यासाठी आज रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मा.उपजिल्हाधिकारी साहेब उदगीर यांना निवेदन दिले शेती कर्जा अभावी जर शेतकऱ्यांच्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर त्यांची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील असे निवेदनात म्हणले आहे तरी मेहरबान साहेबांनी शेतकरी संभाजी बिरादार व शंकुतलाबाई बिरादार यांना कर्ज मंजुरी करून संबंधित बँक अधिकाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय दयावे असे निवेदन प्रहार ता.अध्यक्ष विनोद तेलंगे, ता उपाध्यक्ष मोतीपवळे महादेव, ता संघटक सुर्यभान चिखले, ता प्रसिद्धी प्रमुख अभय कुलकर्णी, ता कार्याध्यक्ष रविकिरण बेळकुंदे,पत्रकार नागनाथ गुटे व शेतकरी संभाजी बिरादार गोपी बिरादार उपस्थित होते
Tags
news
