आदीमायेचे स्तवन: स्त्री शक्तीस नमन!” या नवरात्र उत्सव विशेष विषयावर महिलांसाठी बेबिनार संपन्न




शिरपूर : शुक्ल यजुर्वेदीय गोवर्धन ब्राह्मण मंडळ धुळे (महिला समिती) आयोजित भगिनींसाठी महिला सक्षमीकरण संदर्भात “आदीमायेचे स्तवन: स्त्री शक्तीस नमन!” या विषयावर नवरात्र उत्सवाचे औचित्य साधुन दि. 23/10/2020 वार शुक्रवार रोजी (वेळ दु. ४ ते ५) एकदिवसाचे एक तासाचे वेबिनार झुम ॲप व्दारे आयोजित करण्यात आले.
शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण मंडळातर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. त्यातील एक भाग म्हणजे नवरात्र उत्सव या वर्षी कोरोना संकटाच्या महामारीत, लॉकडाऊन मुळे हा कार्यक्रम वेबिनार स्वरुपात घेण्यात आला. वेबिनारसाठी प्रमुख वक्ता म्हणून शिरपूर येथील एस.पी.डी.एम. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील संरक्षण व सामरिकशास्त्राच्या विभागप्रमुख डॉ. कविता धर्माधिकारी होत्या.
सदर बेबिनार मध्ये त्यांनी आपले मौलिक व अभ्यासपूर्ण विचार अतिशय शास्त्रशुध्द आणी सोप्या पद्धतिने मांडले. आदिशक्तीची विविध रुप, आदिशक्तीची पूजा का करायची? त्यामागे विज्ञान काय आहे? आणि तिला नमन का करायचे, सण-उत्सव, परंपरा उत्सव आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, आत्मीक, आध्यात्मिक शक्ती, ताणतणाव मुक्ती याचे अतिशय समर्पकरित्या व काही एैतिहासिक उदाहरण देऊन त्यास विश्लेषणात्मकरित्या सादरीकरण केले. विविध मुद्द्यांची सहज गुंफण करीत आताच्या स्त्रीला कशाची गरज आहे हे देखील त्यांनी सांगितले. तिच्यात आत्मविश्वास कसा वाढेल यासाठी काही संकल्प सांगितले. या आधुनिकतेच्या काळात महिलांच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य काय ? आपली सुरक्षा, तिची समाजातील भूमिका इ. विषयावर सविस्तर विवेचन केले. या ऑनलाईन वेबिनारमध्ये विविध राज्यांतुन ८० महिला सहभागी होत्या. 
या संपुर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाच्या उपाध्यक्षा व सौ. ज्योती कुळकर्णी तसेच संपूर्ण वेबिनारचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सौ.जया जोशी यांनी केले. 

ऑनलाईन वेबिनारच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष महेश मुळे, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत जोशी तसेच महिला उपाध्यक्षा सौ. ज्योती कुलकर्णी, सौ.जया जोशी, सौ.माधवी गोरे, सर्व महिला समिती सद्स्या, मंडळाच्या सर्व कार्यकारणीतील सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने