शिरपूर येथील आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयात दि. २७ ऑक्टोबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन




शिरपूर : येथील आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयात दि. २७ ऑक्टोबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालय व व्ही. एल. एन. कमर्शिअल कार्पोरेशन औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मध्ये विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग आहे. पदविका, पदवी, पदव्युत्तर फार्मसी विज्ञान व अभियांत्रिकी या शाखांसाठी आयोजन आहे. तरी सर्व शाखेतील विद्यार्थ्यांनी दि २७/१०/२०२० रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत नावनोंदणी करावी असे महाविद्यालयाचे चे प्लेसमेंट अधिकारी डॉ. हितेंद्र महाजन यांनी कळविले आहे. 
इच्छूक उमेदवारांनी या दिवशी उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुराणा यांनी केले आहे.
या अयोजना साठी फार्मासी महाविद्यालयाचे प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी मेहनत घेत आहेत.

संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुराणा, उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने