श्री विले पार्ले केळवाणी मंडळ संचालित इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी धुळे येथील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागातर्फे "गेट -२०२१ परीक्षेची तयारी व महत्त्व" या विषयावर ऑनलाईन तज्ज्ञ व्यक्तींचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. कोरोना विषाणूच्या प्रकोपाला रोखण्यासाठी सुरु असलेल्या ऑनलाईन शिक्षण प्रणाली मुळे इंजिनिअरिंग शाखेतील प्राध्यापकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी घरी बसून ऑनलाईन गेट -२०२१ परीक्षेची संपूर्ण माहिती देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी प्रा. वैभव ढोरे या तज्ज्ञ मार्गदर्शक यांनी मार्गदर्शन केले. प्रा. वैभव ढोरे हे व्हीजेटीआय मुंबई येथे संगणक अभियांत्रिकी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. वरील विषया अंतर्गत त्यांनी महाविद्यालयाच्
या कार्यक्रमातंर्गत सहभागी सर्वांना विविध पीएसयू आणि उच्च अभ्यासामध्ये गेट परीक्षेचे महत्त्व, अभ्यासक्रम आणि चिन्हांकन योजनेचे विश्लेषण, चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी विषयानुसार विषय क्लब, माहिती चे भिन्न स्रोत सामायिक करणे इत्यादी सर्व बाबींची विस्तृत माहिती मिळाली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .निलेश साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना गेट परीक्षेचे महत्त्व या विषयावर संबोधित केले. या उपक्रमाला १०२ विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला.
हा उपक्रम मायक्रोसॉफ्ट टीम्स या ऑनलाइन व्यासपीठावर आयोजित करण्यात आला. कार्यशाळेला समन्वयक म्हणून प्रा. राजकुमार यादव आणि प्रा. नितीन कावडे आणि संयोजक म्हणून डॉ. भूषण चौधरी यांनी भुमिका पार पाळली. या कार्यशाळेमध्ये प्रा. सागर बडजाते, प्रा. रुबी मंडल यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
