नीतेश भाव देईना , म्हने बिहार मला पाव ना




महा live वृत्त संस्था - 

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे कुटुंब गेल्या एक वर्षांपासून सैरभैर झाल्याचे निदर्शनास येत आहे , आता सामान्य जनतेतही या कुटुंबाने अशा विचित्र वागण्याने आपलंच हसे करून घेतले आहे .

पक्षाने बिहार प्रभार दिलाय पण …

नितीश कुमारांनी फडणवीसांची बिहारात प्रभारी म्हणून नियुक्ती होताच आपली तीव्र नापसंती भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांना कळवून इस पनौतीसे हम कोई बातचीत नहीं करेंगे , सीट शेयरिंग के लिये सीधे केंद्रीय नेतृत्वसे बातचीत होगी असा पाणउतारा नितीश कुमारांनी केल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे म्हणून मग केंद्रीय नेतृत्वाने राष्ट्रीय महासचिव भुपेंद्र यादव यांना लगबगीने बिहारला लगेच पाठवून दिले .

संघाच्या शिकवणीचे काय ?

संघ किंवा भाजपमध्ये एक शिकवण असते जी सर्व प्रभारी पाळत असतात , एकदा कुठल्या राज्य निवडणुकीत प्रभार मिळाला की तिकडची मतमोजणी आणि नंतर जय पराभवाचा अहवाल बनवल्याशिवाय पाय बाहेर टाकायचा नसतो पण सैरभैर फडणविसांचा एक पाय पाटण्यात तर एक पाय मुंबईत असतो , या वागण्याने जेपी नड्डा पण नाराज असल्याची चर्चा दिल्लीत सुरू आहे .

बिहारात बंडखोरी 

बिहार मधले सुशील मोदीही फडणवीसांप्रमाणे आयत्या पिठावर नागोबा आहेत , संघटनेत मेहनत रामेश्वर चौरसिया ,राजेंद्र सिंह करतात ( इकडे मुंडे खडसे करायचे ) मात्र मलई छोटे मोदी खात असत पण यंदा भाजप संघटनेत ग्रासरूट लेव्हलला काम केलेल्या खूपशा बड्या नेत्यांनी अपक्ष किंवा लोजपा कडून उमेदवाऱ्या दाखल केल्याने फडणवीसांना बिहार पावण्याची शक्यता खूप कमी दिसत आहे .

त्या सिडी मध्ये दडलंय काय ?

एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश काल उरकलाय पण गेल्या वर्षंभर ते एका सिडीचा उल्लेख करत असतात , जी एका मंत्र्यांच्या पीएची असल्याचा त्यांचा दावा असतो .

पण खडसे गटातील विश्वस्त सुत्रांच्या माहितीप्रमाणे ही सिडी जळगाव जिल्ह्यातील एका माजी हेवीवेट मंत्र्याची असून हा मंत्री देवेंद्र फडणवीसांचा हनुमान म्हणूनही ओळखला जात असे 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने