अनुदानित आश्रम शाळेतील पहारेकरी पदार्थ नियमित वेतनश्रेणी लागू करा व कामाचे तास कमी करा अशी मागणी चे पत्र छावा संघटननेने माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या कडे केली आहे.
आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रम शाळेमध्ये पहारेकऱ्यांना अल्प मानधन मध्ये 24 तास काम करण्याचे सांगण्यात येते पण मागणी करून सुद्धा संबंधित विभागाने आश्रम शाळेतील पहारेकरी यांना वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली नाही तरी आपण वित्त विभागाकडे पाठपुरावा करून संबंधित कर्मचार्यांना वेतनश्रेणी लागू करून कामाचे तास कमी करावे प्रशासनाने तातडीने जीआर काढून देखील त्याची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांना अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे तरी आपण संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून सदरचा विषय मार्गी लावावा अशी मागणी करण्यात आलेली आहे स्वाभिमानी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी संबंधित आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरावा केला असून अद्याप पर्यंत कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत तरी या बाबत आपण पाठपुरावा करावा अशी विनंती छावा संघटना यांनी केले आहे त्यावेळी नानासाहेब कदम जिल्हाध्यक्ष छावा संघटना धुळे, अर्जुन नाना पाटील जिल्हा सचिव छावा संघटना धुळे, भाऊसाहेब प्रदीप जाधव उत्तर महाराष्ट्र छावा संघटना धुळे ,दिनेश भाऊ काळे महानगरप्रमुख छावा संघटना धुळे ,मनोज पवार उप महानगर प्रमुख छावा संघटना धुळे इत्यादी उपस्थित होते.
