शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या सतर्कतेमुळे आज विजयादशमीच्या पावन दिनी बारा गाईंना 2 गोऱ्हे यांना जीवनदान देण्यात शहर पोलिसांना यश आले आहे . मध्यप्रदेश कडून धुळ्याकडे जाणाऱ्या टाटा 407 या वाहनात गुरांची निर्भयपणे वाहतूक करताना आढळल्यामुळे शहर पोलिसांनी गोपनीय बातमीच्या आधारे सापळा रचून या वाहनावर कारवाई केली असून गोवंश जनावरांना जीवनदान दिले आहे.
शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने आज दिनांक 25 रोजी शिरपूर टोल नाक्यावर एक पथक तयार करून सापळा रचला होता सदरच्या पथकात हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर संदीप मुरकुटे आर.एन. मोरे, एन.जी. पोद्दार, एम.डी.सपकाळ ,हेमंत पाटील ,मुजाहिद्दीन शेख ,बी.एल मालचे इत्यादीच्या पथकाने मध्यप्रदेश कडुन धुळ्याकडे जाणाऱ्या टाटा 407 mp13 g b 0304 या वाहनाला थांबत चालक भुरा कुरेशी वय 38 याला ताब्यात घेत या गाडीतील 2 गोरे व 12 गाई दाटीवाटीने कोंबून कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असल्याचे आढळल्याने कारवाई केली आहे.
सदरच्या गुरांची गोशाळा येथे रवानगी करण्यात आली असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत जवळपास 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Tags
news
