डॉक्टर बनून फौजदारांनी सराईत गुन्हेगाराला रंगेहाथ पकडले*



*मंद्रुपचे जिगरबाज फौजदार गणेश पंगुवाले यांची कौतुकास्पद कामगिरी*              

 सोलापूर .(प्रतिनिधी ); दक्षिण तालुक्यातील मंद्रुप पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष फौजदार गणेश पंगुवाले यांनी तात्पुरती डॉक्टरची प्रमुख भूमिका बजावत सराईत गुन्हेगाराला रंगेहाथ पकडले.
 फौजदार पंगुवाले यांनी  केलेल्या  अफलातून कामगिरीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे ,
याबाबत  सविस्तर  माहिती एक सिनेमातील कथानकप्रमाणेच आहे, 
आरोपी अशोक उर्फ आशिकार्या छपरु काळे (वय-३५. रा-नायकोडे वस्ती मोहोळ)
हा सोहेल सलिमअहमद मुल्ला-जहाँगीरदार (वय-२३.रा-बबलेश्वर नाका विजयपूर कर्नाटक ) याला आणि  त्याच्या तीन मित्रांना स्वस्तात सोने देतो म्हणून फोन करुन तेरामैल चौकात बोलावून घेतले,आलेल्या या चौघांना निर्मनुष्य असलेल्या औराद रस्त्यावर नेले त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन आरोपी रोख रक्कम ७५ हजार रुपये मुद्देमाल लुटला. 
या प्रकरणाचा तपास करताना मंद्रुपचे फौजदार गणेश  पंगुवाले यांनी आरोपीचा प्रवास आणि  इतर तांत्रिक बाबीचा पूर्णतः अभ्यास करुन आरोपी सध्या नेमका कुठे आहे याची माहिती घेतली.
पूर्ण माहिती  मिळताच शनिवार दि,२४ रोजी सकाळी साडेदहा वाजता   फौजदार गणेश पंगुवाले यांनी  आपल्या जवळच्या तीन विश्वासू पोलिस साथीदारांना घेऊन आरोपीला अटक करण्याच्या मोहिमेवर निघाले.
मोहिम फत्ते करण्यासाठी त्यांना डॉक्टर होणे  योग्य वाटले कारण ही तसा होता, सध्या कोरोनाची साथ चालू आहे,जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी आहे असे बोलल्यावर संशय येणार नाही याची त्यांना खात्री झाली.
डॉक्टर वेश धारण केले,दोन लाल रंगाचे प्लस चिन्हाचे प्रिंट काढून खासगी मोटार कारला पुढे आणि मागे लावून घेतले आणि मोटार कार पानमंगरुळ (अक्कलकोट)च्या दिशेने निघाली.
पानमंगरुळ गावात यायला दुपारचे बारा वाजले होते,खाली उतरताच डॉक्टरांची टीम आजूबाजूच्या  घरांची संपूर्ण माहिती नाव,पत्ता ,कोणाला सर्दी खोकला किंवा कोरोनाची लक्षणे  आहेत का? 
याबाबत  विचारणा सुरु केली आणि मिळालेली  सर्व माहिती वहीत नोंद करुन घेतली.
आरोपीच्या घरी जाऊन त्याची पण संपूर्ण माहिती घेतली,आरोपी कोण कोण आहेत ? याबाबत तर्क लावला.
आजूबाजूच्या  परिसराची चोख पाहणी करुन मंद्रुप पोलिस ठाण्यातून  आणखी पाच पोलिस कर्मचारी आणि पिकअप टेम्पो मागून घेतला.साधारणतः 
दुपारी  तीनच्या दरम्यान सोबत आणलेल्या पोलिस टीमला कामाला लावली.
गावापासून अलीकडे थांबून मँप काढून घेतला.
पोलिस कर्मचारी कोण कोण कुठे कुठे थांबायचे याबाबत  सविस्तर सूचना देऊन  
ट्रँप लावण्यात आला.
आरोपी राहत असलेल्या घरी जाऊन मोठ्या शिताफीने आरोपीला रंगेहाथ पकण्यात यश मिळाले.
डॉक्टर बनून जिगरबाज फौजदारने केलेल्या महत्त्वाच्या  कामगिरीबद्दल कौतुक होत आहे . 
ही मोहिम फत्ते करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन थेटे यांचे  मार्गदर्शन लाभले.आणि  पोलिस  कर्मचारी  विश्वास पवार,भरत चौधरी,यशवंत कलमाडी,किरण चव्हाण,संजय कांबळे,अमोल वाघमारे,महांतेश मुळजे,ओंकार व्हनमाने ,रवी हात्तकिले यांचे ही सहकार्य  लाभले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने