शिवसेना धुळे ग्रामीण संपर्क कार्यालयात* *महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती साजरी




धुळे (प्रतिनिधी) : रामायणाचे रचनाकार, आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती शिवसेना धुळे ग्रामीण संपर्क कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेनेचे धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख श्री.हेमंत साळुंके यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.
       यावेळी बोलतांना श्री.साळुंके म्हणाले की, रामायण हे महाकाव्य आहे. आणि हे महाकाव्य लिहिणारे महर्षी वाल्मिकी ऋषी आहेत. महर्षी होण्यापूर्वी त्यांचे पूर्वाश्रमीचे जीवन आपणां सर्वांना ठाऊक आहेत. मनुष्यातील र्दुगुणांचा नाश झाल्यास मनुष्य किती मोठा होऊ शकतो याचे सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे वाल्मिकी ऋषी होय. आपण सर्वांनी स्वत:तील र्दुगुणांचा नाश करण्यासाठी प्रयत्न करावेत. मुख्यत्वे आजच्या तरुणांनी वाल्मिकी ऋषींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी. त्यातुन एका स्वच्छ व सुंदर समाजाची निर्मिती होईल, असेही ते म्हणाले.
       यावेळी शिवसेना धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, मुंबई येथील पांडूरंग सोलकर साहेब, आदिवासी कोळी समाज समन्वय समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य गिरधर महाले, खान्देश विभाग कार्याध्यक्ष दिलीप बागुल, धुळे तालुकाध्यक्ष देविदास नवसारे, धुळे शहर प्रमुख राज कोळी, सामाजिक कार्यकर्ते सुकदेव बागुल, वसंत जाधव, नयन जाधव, मयूर जाधव, कैलास कोळी, अरुण वाघ, एमसीएल कंपनीचे योगेश पवार, महेश माळी, रुपेश मराठे, किशोर महिरे, राजु बोरसे आदी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने