रोहिणि प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत दहिवद येथे मानव विकास शिबीर संपन्न




   मा.जिल्हाआरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार दि.21/10/2020 रोजी दहिवद येथे मानव विकास शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते.
ग्रामीण भागातील शुन्य ते सहा वर्ष वयाच्या बालकांची आरोग्य तपासणी बालरोगतज्ञ डॉ. राजेंद्र पेंढारकर व गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी डाॅ.सुनिल वाणि स्त्रीरोग तज्ञ यांनी केली.
आजच्या शिबीरात एकुण 33 गर्भवती मातांची व शुन्य ते सहा वर्षांतील 32 बालकांची आरोग्य तपासणी करुन आजारी असलेल्यांना योग्य तो औषधोपचार करण्यात आला.
आजच्या शिबिराच्या अनुषंगाने दहिवद उपकेंद्र अंतर्गत कार्यरत सर्व अंगणवाडी सेविका,सर्व आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांची एकत्रित समन्वय सभाही घेण्यात आली.डाॅ.राष्ट्रपाल अहिरे वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र रोहिणि यांनी सभेस संबोधित करतांना सांगितले कि कुपोषण निर्मुलन व बालकांच्र्या अण महिलांसाठी आरोग्य योजना राबविताना अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्यांमचारी यांना समन्वयाने काम करण्याच्या सुचना दिल्यात.तसेच पुढिल आठवड्यात उपकेंद्र अंतर्गत सर्व अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्य तपासणी करीता नियोजन करण्याच्या सुचना दिल्यात. 
अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती वळवी मॅडम यांनीही पोषण आहार व बालकांचे वजन उंची नुसार नियमित तपासणी संदर्भात चर्चा केली.
कोव्हिड 19 आजाराच्या सुरवातीपासून ते आजपर्यंत चांगल्या पध्दतीने कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका व आशास्वयंमसेविका यांचा प्रातिनिधिक प्रशस्तिपत्रक देवुन गौरव करण्यात आला.डाॅ.राष्ट्रपाल अहिरे व श्रीमती शिंदे सिस्टर यांच्याहस्ते प्रशस्तिपत्रक वाटप करण्यात आले.
    आजच्या शिबिरासाठी डाॅ.अहिरे यांच्या मार्गदर्शनाने दहिवद येथिल कर्मचारी डिंगबरकोळी,प्रविण गिरासे,अनिल मराठे,कासम पिंजारी,सुनिल भवर,बागुल नाना,शिरसाठ लॅब टेक्निशियन,श्रीमती शिंदे सिस्टर,पाडवा सिस्टर,नाईक सिस्टर ,मोरे सिस्टर व कुणाल पावरा व अनिल बंजारासह सर्व कर्मचारीवर्ग यांचे सहकार्य लाभले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने