आजच्या संक्रमणाच्या, धकाधकीच्या परिस्थितीने व व्यस्त जीवनशैली मूळे हृदय विकार व तत्सम आजारांचे प्रमाण वाढले आहे.
यावर उपाय म्हणजे वेळेआधी अचूक निदान करणे हेच आपले आरोग्य अबाधित राखते.
धुळे शहरातील प्रतिथयश
कार्डियोलॉजिस्ट डॉ.प्रांजल पाटील यांच्या गणपती हार्ट केअर सेंटर येथे, रोटरी क्लब ऑफ धुळे विद्यानगरी मार्फत हार्ट हेल्थ केअर शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 2D इको, स्ट्रेस टेस्ट, रक्तातील चरबीचे तसेच साखरेचे प्रमाण अशा हृदययाशी निगडित चाचण्या घेण्यात आल्या.
कोरोना महामारीच्या अनुषंगाने सर्व खबरदारी घेऊन २५ जणांची हृदय तपासणी करण्यात आली.
सदर शिबिरास रोटरी क्लब ऑफ धुळे विद्यानगरी चे अध्यक्ष श्री भुषण माळी तसेच सेक्रेटरी श्री भूपेंद्र देवरे उपस्थित होते.
चाचणी झालेल्या व्यक्तींनी शिबिराबद्दल समाधान व्यक्त केले.
Tags
news
