शिरपूर – एका २२ वर्षीय अविवाहित युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील नांथे येथे आज दि.१० ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली आहे.विशाल नरेंद्रसिंग पवार वय २२ रा.नांथे असे गळफास घेणाऱ्या युवकांचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्याला त्याचे वडील व नातेवाईकांनी मयत अवस्थेत उत्तरीय तपासणीसाठी शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्या पश्चात आई ,वडील व एक मोठा भाऊ आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
Tags
news
