मुंबई - करणी सेनेने आज मुंबई मध्ये मड आयर्लंड येथे अश्लील वेब सिरीज चे शुटिंग बंद केले असून या विरोधात मालवणी पोलिसात तक्रार केली आहे त्या मुळे या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अश्लील वेब सिरीज विरुद्ध करणी सेनेने पुकारलेले आंदोलन कौतुकास्पद आहे अशी प्रतिक्रिया समोर येते आहे .असे अश्लील व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होतात , लहान किशोरावस्थेतील मुले/मुली मोबाईल वापरतात असे अश्लील व्हिडिओ बघतात याचा वाईट परीणाम त्यांचे बालमनावर होतो व चांगले काय वाईट काय याचे त्यांना भान नसते .
तरूण पिढीतील काॅलेजला जानारी हि मुले अशा वेबसिरीज बघतात व अभ्याकडे त्यांचे लक्ष विचलित होऊन वाम मार्गाकडे वळतात .
संस्कृती प्रधान असलेल्या आपल्या या देशात हि पाश्चिमात्य संस्कृती रूजत चालली असुन मुलींवर/महिलांवर रोज होणारे अत्याचार अशा घान माणसिकतेतुनच घडत आहेत .
या सर्व गैर प्रकारची मुबंई करणी सेना यांनी दखल घेऊन हे आंदोलन केले म्हणून याचे राज्यभरात अभिनंदन होत असून संगटनेचे राष्ट्रीय अद्यक्ष मा.सुरजपाल अम्मुजी ,महाराष्ट्राचे पदाधिकारी व मार्गदर्शक मा.मधुकर आण्णा ढेमसे ,देवचंदजी बारवाल, आणि सर्वच पदाधिकारी यांनी अभिनंदन करून मार्गदर्शन केले आहे.
Tags
news
