भाजयुमोच्या विद्यार्थी आघाडी प्रदेश प्रमुखपदी यशवर्धन कदमबांडे यांची निवड


धुळे - शहरातील युवा नेते यशवर्धन कदमबांडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीच्या प्रदेश प्रमुखपदी निवड झाली आहे. माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघटनमंत्री विजयराव पुराणीक यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाचे प्रभारी संजय कोडगे, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी नियुक्ती केली असुन पञ दिले आहे. 
यशवर्धन कदमबांडे हे शहराचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांचे चिरंजीव आहेत. यशवर्धन कदमबांडे हे गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर विद्यापीठाने देखील परीक्षा शुल्क माफ केले होते. तसेच  यशवर्धन कदमबांडे यांनी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, रोजगार मेळावे, वृक्षारोपण यासारखे कार्य देखील त्यांनी हाती घेतले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल माजी मंत्री गिरीष महाजन, माजी मंत्री जयकुमार रावल,  खा.डॉ.सुभाष भामरे, माजी मंत्री अमरिशभाई पटेल, माजी आ.राजवर्धन कदमबांडे, जि.प.अध्यक्ष तुषार रंधे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, भुपेशभाई पटेल,भाजप जिल्हाध्यक्ष बबन चौधरी ,मा. जि प अध्यक्ष शिवाजीराव दहिते, महापौर चंद्रकांत सोनार, माजी महापौर जयश्री अहिरराव, माधुरी बाफना, हिरामण गवळी, मायादेवी परदेशी यांनी कौतुक केले आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने