भाजी घेण्यासाठी गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरट्यानी केले लंपास




नाशिक, इंदिरानगर  वार्ताहर : पाथर्डी परिसरात  भाजी  घेण्यासाठी गेलेल्या  महिलेचे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र किंमत सुमारे साठ हजार  रुपये  अज्ञात चोरट्यांनी  ओरबाडून नेल्याची घटना  घडली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पौर्णिमा राजेश पवार (वय 39 रा  पांडुरंग चौक , पाथर्डी फाटा ह्या  दि10 शनिवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नरहरी लॉन्स , पाथर्डी  फाटा येथून भाजीपाला घेवुन रस्त्याने घरी पायी जात असतांना त्यांचे समोरून काळया रंगाचे मोटार सायकलवर आलेल्या दोन इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे   सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओरबाडून पळ काढला याप्रकरणी पवार यांनी दिलेल्या फिर्याद नुसार इंदिरानगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश भामरे करत आहेत

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने