शिरपूर : (प्रतिनिधी) - दि.१७ ऑक्टोबर २०२० शनिवार रोजी बोराडी येथील देवमोगरा माता मंदिर येथे बिरसा ब्रिगेड चे संस्थापक सतिषदादा पेंदाम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने सातपुडा विभाग अध्यक्ष , सुंदर पावरा, जिल्हाध्यक्ष दिनेश पावरा, तालुकाध्यक्ष भरत पावरा यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा सचिव विजय पावरा, जिल्हा कोषाध्यक्ष रमेश पावरा यांच्याहस्ते धुळे जिल्हा व शिरपूर तालुक्यातील बिरसा ब्रिगेड संघटनेचे नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन नियुक्ती करण्यात आली. यावेळी बिरसा ब्रिगेड सातपुडा जिल्हा कार्यकारणीत जिल्हाउपाध्यक्ष जगदिश हिरालाल पावरा, जिल्हा कार्याध्यक्ष लवकुश आसाराम पावरा , जिल्हा सहसचिव सुनिल प्रताप मुखडे , जिल्हा सह सल्लागार कैलास गणू भिल , जिल्हा संघटक विकास | सुक्राम मुखडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र खंडू पावरा , जिल्हा संपर्क प्रमुख अरुण मणीलाल पावरा, जिल्हा सह कोषाध्यक्ष दिवाण सापा पावरा , व शिरपूर तालुका महिला अध्यक्ष सौ.सोनल चंदन पावरा , उपाध्यक्ष सुनिल दुरसिंग पावरा , उपाध्यक्ष रोहिदास नजरसिंग पावरा, तालुका दशरथ आरशा पावरा , सहसचिव छगन जामसिंग पावरा , कोषाध्यक्ष प्रताप पावरा ,सहकोषाध्यक्ष सर्जेराव नकाराम पावरा , कार्याध्यक्ष मनोहर दौलत पावरा , सहकार्याध्यक्ष अर्जुन चिमा पावरा, सह कार्याध्यक्ष अर्जुन भिल, संघटक बबन पावरा , सल्लागार मनोज ओंकार पावरा , सल्लागार वानसिंग सूनसर भिलाडा , सल्लागार इंदास प्रेमसिंग पावरा , सल्लागार सुरेश गुलाब पावरा,सहसल्लागार यशवंत दत्तू पाडवी , सह सल्लागार अनिल कन्हैयालाल पावरा संघटक आण्णा धरमसिंग पावरा, सहसंघटक संतोष नादर पावरा , सहसंघटक बाजीराव दिपला पावरा , प्रसिद्धी प्रमुख प्रकाश पावरा , प्रसिद्धी प्रमुख दिनेश संतोष पावरा , तालुका संपर्क प्रमुख अनिल झुलाल पावरा , संपर्क प्रमुख धर्मेद्र गब्बरसिंग पावरा, सहसंपर्क प्रमुख अजित उत्तम पावरा , सदस्य सुनिल पावरा, कैलास पावरा , रोहन शाम पावरा , विनोद पावरा , बाबूलाल पावरा यांची निवड करण्यात आली. या बैठकीत बिरसा ब्रिगेडचे सातपुडा अध्यक्ष सुंदर पावरा यांनी बिरसा ब्रिगेड या संघटने उद्दिष्ट्ये आणि ध्येय व संघटनेचे महत्व सांगितले तर प्रस्तावना व सूत्रसंचालन तालुका सचिव दशरथ पावरा यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष भरत पावरा यांनी मानले.
Tags
news
