तनुष्का सिसोदेचे नीट परीक्षेत सुयश




शिरपूर : येथील सिसोदे हॉस्पिटलचे संचालक डॉ.सुदीप सिसोदे व भारती सिसोदे यांची सुकन्या तनुष्का सिसोदे हिने वैद्यकीय प्रवेश (नीट) परीक्षेत 720 पैकी 608 गुण मिळवून लक्षणीय यश संपादन केले.
तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येथील आर.सी.पटेल इंग्लिश मेडिअम स्कूल व ए.आर.पटेल सीबीएसई स्कूलमध्ये झाले आहे.
वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी तिला नांदेड येथील प्रा.भार्गव राजे (आयआयबीजेचे प्राध्यापक), आर.सी.पटेल इंग्लिश स्कूल व ए.आर.पटेल सीबीएसई स्कूलच्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या यशा बद्दल माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, सीईओ डॉ.उमेश शर्मा, जी.डी. सिसोदे, श्रीमती पुष्पा सिसोदे, डी.पी. ठाकरे, श्रीमती विद्या ठाकरे यांनी कौतुक केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने