पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित पिक विमा साठी शासनाने पपई पिकाचा समावेश करावा - माजी मंत्री अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांचा पत्रव्यवहार





शिरपूर : पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित पिक विमा सन २०२०-२०२०१ साठी पपई पिकाचा समावेश करण्यात यावा या मागणीसाठी माजी मंत्री अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, जिल्हा परिषद सदस्या सौ. अभिलाषा भरत पाटील यांनी कृषी मंत्री ना. दादाजी भुसे व पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याकडे पत्रव्यवहार करुन मागणी केली आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.

पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित पिक विमा सन २०२०-२०२०१ साठी पपई पिकाचा समावेश करण्यात यावा याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद सदस्या सौ. अभिलाषा भरत पाटील यांनी माजी मंत्री अमरिशभाई पटेल व आ काशिराम पावरा यांना दिले. याबाबत तात्काळ निर्णय घेऊन माजी मंत्री अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री ना. दादाजी भुसे व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याकडे पत्रव्यवहार करून पंतप्रधान पिक विमा योजनेत पपई पिकाचा समावेश करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित पिक विमा सन २०२०-२०२०१ साठी डाळिंब, द्राक्षे, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा, काजू, स्ट्रॉबेरी या ८ फळपिकांचा महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यासाठी शासन निर्णय ५ जून २०२० व १२ जून २०२० नुसार अटी शर्ती अधिसूचित फळपिकांच्या धोके निकषानुसार राबविण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात पपई या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. परंतु, अतिवृष्टी किंवा गारपीट, अन्य कारणाने नुकसान झाल्यास पंचनामे करण्यात येत नाहीत. यामुळे पपई पिकाचा समावेश पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित पिक विमा सन २०२०-२०२०१ साठी समावेश होणे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असून त्या दृष्टीने शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने