तरडी, हिसाळे, तोंदे येथील नुकसानग्रस्त पिकांची आ काशिराम पावरा यांनी केली पाहणी



शिरपूर : तालुक्यातील तरडी, हिसाळे, तोंदे येथील नुकसानग्रस्त केळी, पपई व अनेक पिकांची आ. काशिराम पावरा यांनी पाहणी केली असून सर्व नुकसानग्रस्त शेतकरी बांधव यांना धीर दिला. तसेच प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन मदत देण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.

यावेळी आमदार काशिराम पावरा, तहसीलदार आबा महाजन, जिल्हा परिषद सदस्या बेबीबाई पावरा, कुटवाल पावरा, माजी पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, गयभू पाटील, मोहन पाटील, कमलाकर पाटील, योगराज पाटील, मच्छिंद्र पाटील, श्रावण वंजारी, तोंदे उपसरपंच अनिल पाटील, गुलाब पाटील, विनोद वंजारी, अरुण शिंपी, अविनाश पाटील, अनेक शेतकरी बांधव  उपस्थित होते. सर्व शेतकरी बांधव यांनी शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई मिळावी असे सर्व शेतकऱ्यांनी आपले म्हणणे यावेळी 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने