शिरपूर : पळासनेर ते धुळे दरम्यान असलेले राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत. ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर भा.ज.पा.युवा मोचा तर्फे करण्यात आली आहे. भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पळासनेर -धुळे टोल नाका व्यवस्थापक सतिष चव्हाण यांना दि.२० ऑक्टोबर रोजी भाजयुमोच्या तर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा मा.जिल्हासरचिटणीस अरुण धोबी, मा.जिल्हा चिटणीस संजय आसापूरे, भाजपा शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, भाजयुमो मोर्चा शिरपूर शहराध्यक्ष विक्की (चेतन) चौधरी , भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, भटू माळी, राधेश्याम चौधरी, राज सिसोदीया, पप्पू राजपूत, भुरा पाटील, हिरालाल कोळी, तुषार पाटील, राहूल भामरे, मनोज पाटील, रवी राजपूत, विश्वनाथ माळी, राकेश अग्रवाल आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी धुळे, उपविभागीय अधिकारी शिरपूर, तहसिलदार शिरपूर यांनाही देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, मुंबई - आग्रा महामार्गावरील पळासनेर- धुळे रस्त्यावर मोठया प्रमाणावर रस्त्यावर खड्डे झालेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळेत रस्ता दुरुस्ती करणे आवश्यक असताना वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणावर टोलवसूली केली जाते. ५० कि.मी. अंतरात तीन टोल नाके उभे असून जनतेकडून आर्थिक लूट होत आहे. पळासनेर येथील टोल नाका शिरपूर येथे अनधिकृतपणे उभा केला आहे तसेच रस्त्यावर मुतारी,शौचालय अत्यंत खराब परिस्थितीत आहेत त्याकडे आपले कुणाचेही लक्ष नाही. वाहनचालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच डिव्हायडर मध्ये असलेली झाडांची व्यवस्थितपणे कटींग न झाल्यामुळे ती झाडे येणाऱ्या वाहनांना लागत असतात. शिवाय झाडांमध्ये गुरे-ढोरे चरत असतांना वाहन धारकांना धोका आहे. तरी पळासनेर-धुळे रस्त्यावरील खड्ड्यांची दुरूस्ती त्वरीत करण्यात यावी अशी मागणी भा.ज.पा युवा मोर्चा शिरपूर यांच्यावतीने करण्यात आली आहे.
Tags
news
